भारताचा प्राचीनकाळी म्हणजे वैदिक आणि बुध्द काळ हा स्त्री स्वातंत्र्याचा काळ होता,परंतु मौर्य साम्राज्याचा राजा बृहद्रथ याची हत्या त्याच्याच ब्राम्हण सेनापती पुष्यमित्र शुंग याने केली,आणि त्याच्या देशात मनुस्मृती लागू केली,म्हणजे मनू च कायदा लागू केला.ज्यात ब्राम्हण क्षत्रिय वैश्य हे अभिजन आणि शूद्रांना आणि महिलांना आणि सेवेची कामे करणाऱ्यांना आणि सर्व श्रमिकांना कष्टकऱ्यांना सर्व हक्क स्वातंत्र्य नाकारले,त्यांना गुलामी च दर्जा दिला,हे सारे बहुजन आणि ब्राम्हण क्षत्रिय वैश्य यांना संपती बाळगण्याचा,शिक्षणाचा हक्क देऊन त्यांचे वर्चस्व व श्रेष्ठत्व स्थापन केले.
पूर्वी ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रिया सर्वानाच गुण कर्मानुसार कोणत्याही वर्णात प्रवेश मिळायचा,त्यावर मनूने बंदी घातली.ज्याचा जो व्यवसाय तो त्या जातीचा.असा कायदा केला.आणि ज्या जातीत जो जन्मतो त्याला इतर जातीत प्रवेशबंदी केली.म्हणजे कर्मावरून वर्ण व जात न ठेवता जन्मावरून म्हणजे त्याचा वर्ण व जात निश्चित केली.या मनूच्या कायद्यामुळे जातीव्यवस्था निर्माण झाली.
त्यातही उच्चनीच श्रेष्ठ कनिष्ठ अशी उतरंड निर्माण केली.आणि सर्वात उच्च स्थानी ब्राम्हण आणि सर्वात नीच स्थानी दलीत व स्त्रीला दर्जा दिला.केवळ सर्वात खालचा दर्जा देऊन तो थांबला नाही,तर स्त्रीला मासिकपाळी येते म्हणून आणि दलीत हे घानीची कामे करतात म्हणून यांना अस्पृश्य समजले.म्हणजे चार वर्णतील शूद्र (ओ बी सी) ,आणि अतिशूद्र म्हणजे स्त्रिया दलीत हे अस्पृश्यच.याची दोन कारणे दिली.
1.हे सारेच श्रमिक कस्टकरी म्हणून शूद्र.याचा अर्थ उत्पादनाचे निर्मितीचे काम करणारे सारे कामगार कष्टकरी मजूर स्त्रिया हे सारे शूद्र ठरविले.म्हणजे खालच्या दर्जाचे.शिवाय अस्पृश्य समजण्यात आले.शुद्रवरचे वैश्य,त्यावरचे क्षत्रिय त्यावरचे ब्राम्हण मात्र शूद्र नव्हेत.म्हणजे ते शुद्रच्या वरचे,म्हणून ते स्पृश्य,तरी यानचेत पण रोटिव्यवहर असला तरी बेटी व्यवहार नाही,हा नियम केला.
ब्राम्हण सर्वात श्रेष्ठ समजून त्याने त्याच्या खालच्या कोणत्याच जातीशी रोटिव्यावहर व बेटी व्यवहार करायचा नाही,असा नियम केला.धोडक्यात असे की रोटीबंदी, बेटीबंदीचा कायदा करून जाती व्यवस्था पक्की केली.त्यात अस्पृश्यता निर्माण केली.आणि प्राचीन भारताची एकतेची समरसतेची , सलोख्याची , प्रेमाची,बंधुभाव ची भारतीय प्राचीन संस्कृती नष्ट केली.समतेचा विचार नष्ट केला.
आणि विषमतेची बीजे या मनूने पेरली.ही मनुस्मृती उत्तर भारतात प्रथम आपल्या राज्यात राजा पुष्यमित्र शुंग याने लागू केली,आणि दक्षिण भारतात महाराष्ट्रात पेशव्यांनी त्यांच्या राज्यात लागू केली,आणि सर्व अनर्थ झाला.या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत व जाती व्यवस्थेत सगळ्यात हानी स्रीवर्गाची झाली.तिच्या वाट्याला श्रम सेवा कष्ट चूल मूल घरच आले. अर्थकारण,समाजकारण,राजकारण,धर्मकारण या क्षेत्राची दारे बंद झाली.
खरे तर या विषमतावादी आणि पुरुष सात्ताक व्यवस्थेच्या त्या दुहेरी बळी ठरल्या.बाहेर समाजाची गुलामी आणि घरात पुरुषाची गुलामी.तिला विचार स्वातंत्र्य,अभिवक्ती स्वातंत्र्य,चार पैसे बाळगण्याचे स्वातंत्र्य,देवळात जाण्याचे,शिक्षण घेण्याचे सारेच प्रकारचे स्वातंत्र्य नाकारल्या गेले.
15 ऑगस्ट 1947 ले भारत स्वतंत्र झाला.राजेशाही हुकुमशाही संपुष्टात आली,लोकशाही स्थापन झाली.लोकशाही व्यवस्थेचे संविधान बाबासाहेबांनी तयार केले.त्यात स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे अनेक कायदे करून मनूला जमिनीत गाडले आणि स्त्री दलीत शूद्र मुक्त झाले.त्यांची गुलामगिरी संपली.त्यांची खरेदी विक्री पण संपुष्टात आली.मानवी हक्कांचे कायदे बाबासाहेबांनी तयार केले.ते स्वतंत्र भारतास लागू करण्यात आले.
मनूच्या कायद्यात स्त्री ही अपवित्र समजून तिला देव धर्माचा अधिकार नाकारला होता,तो संविधानाने दिला.तिला धन संपती बाळगता येत नव्हती,तर बापाच्या आणि नवऱ्याच्या शेतीत ,संपत्तीत पण हक्क दिला,स्त्रीला आपला नवरा मेल्यानंतर दुसरे लग्न करण्याचा अधिकार नव्हता तो पुनर्विवाहाचा हक्क दिला.विधवेला दुय्यम वागणूक देणे,केशवपन करणे,कुंकू न लावणे,रांगिन कपडे परिधान न करणे हे सारे कायद्याने बंद केले.
स्त्रीला शिक्षण घेण्याचा,नोकरी करण्याचा अधिकार नव्हता तो दिला,कामगार आणि शासकीय व खाजगी कारखाने कार्यालयात 12 12 तास काम करावे लागे,ते फक्त आठ तासाचा वेळ केला,बाळंत राजा,दवाखान्याचा खर्च शासनाने देण्याचा कायदा केला.
राजकारणात भाग घेण्याचा,आरक्षण च कायदा केला,पुनर्विवाह,घटस्फोट,संतती नियमन,याचा पण हक्क पूर्वी नव्हता तो दिला.संविधानात हजारो वर्षापासून स्त्रीवर झालेला अन्याय अत्याचार नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली.त्यामुळे स्त्री पुरुष सत्ता आणि विषमतेच्या व्यवस्थेच्या सत्तेतून जोखडातून,गुलामगिरीतून मुक्त झाली.ती केवळ भारतीय संविधानातील तरतुदी मुळेच.हे कुणालाही मान्यच करावे लागेल.
हिंदू कोडबिल बाबासाहेबांनी संसदेत कायदामंत्री असताना मांडले.परंतु त्यास मान्यता न मिळाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.या गोष्टीचा परिणाम होऊन त्यावेळचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी मनावर घेतले.अनेक हिंदुत्ववादी ब्राम्हणांचा त्यास विरोध असूनही ते बिल परत संसदेत ठेऊन मंजूर करून घेतले.हे हिंदुकोडबिल म्हणजेच स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा होय.
त्यामुळे आज स्त्रीला बापाच्या नवऱ्याच्या संपत्तीत वाटा ,हक्क मिळाला.त्यामुळे ती निर्भय बनली.स्वतंत्र झाली.कारण संपती हेच स्वातंत्र्याचे मूळ आहे.हे बाबासाहेबांनी पक्के जाणिले होते.


