नैसर्गिक घडणच अशी आहे की,व्यक्ती तितक्या प्रकृती,व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि व्यक्ती तितके विचार.याचा अर्थ सारी माणसे सारखी नसतात.प्रकृती,प्रवृत्ती,विचार अलग अलग असतात,याचे कारण निसर्ग हा हवा पाणी अग्नी पृथ्वी आकाश या पंच महा भुतांच्या संयोगातून निर्माण झाला आहे.वनस्पती,पक्षी,जनावर,माणूस ही जीवसृष्टी ही निसर्गाचीच निर्मिती आहे.निसर्गाची प्रकृती ही शितगुनी,वातगुनी, उष्ण गुणी याचे मिश्रण आहे,याच प्रमाणे जीवसृष्टीचे आहे.
माणसाच्या प्रकृतीत पण हे सित,उष्ण,वात आणि समशीतोष्ण हे नैसर्गिक गुण आले आहेत.जसे की आई वडिलांच्या प्रकृतीनुसार मुलाची प्रकृती बनत असते.म्हणून काही व्यक्ती उष्ण प्रकृतीचे,काही शीत प्रकृतीचे तर काहीजण हे वात प्रकृतीचे असतात.म्हणजेच ज्या व्यक्तीत उष्ण शीत वात (वायू) या पैकी ज्याचे प्रमाण किंवा प्रभाव जास्त ती व्यक्ती त्या प्रकृतीची बनते.म्हनुन कुणी उष्ण प्रकृतीचे तर कुणी शीत प्रकृतीचे तर कुणी वात प्रकृतीचे असतात.
पण प्रत्येकात हे तीनही गुण कमी अधिक प्रमाणात असतातच.या गुणांचे कमी अधिक प्रमाणानुसार त्याची प्रकृती बनते.आणि ज्याची जशी प्रकृती तशी त्याची प्रवृत्ती पण बनते.जसे की,ज्याची शरीर प्रकृती उष्ण आहे,तो पित्तप्रकृतीचा,ज्याची शरीर प्रकृती शीत म्हणजे थंड असते,तो शांत प्रकृतीचा,आणि ज्याची शरीर प्रकृती वयुयुक्त म्हणजे तो वात प्रकृतीचा असतो बनतो.आणि तीनही हे नैसर्गिक गुण म्हणजे पित्त शीत वात गुण समान असतात.
ते समतोल प्रकृतीचे म्हणजे सात्विक गुणाचे असतात.माणसाची प्रवृत्ती ही या तीन गुणांनुसार बनत असते.प्रवृतीनुसार स्वभाव बनत असतो.जसे की,जो उष्ण प्रकृतीचा तो पित्तगुनी म्हणून तो अग्निगुनी म्हणजेच क्रोधी स्वभावाचा बनतो.शितगुणी ह्याचा स्वभाव शांत असतो.थंड असतो.वयुप्रकृतीचा माणूस समशीतोष्ण असतो.समतोल पण असतो.
प्रकृतीचा परिणाम जसा प्रकृतीवर होतो,त्यानुसार त्याचा स्वभाव म्हणजे क्रोध लोभ मन माया लोभ या विकृती,तसेच पित्त वात कफ च समतोल ज्याचेत तो सत्वगुनी,बनतो.म्हणजेच प्रकृतीनुसार माणसाचे मन बनत असते.आणि मनाचा स्वभाव हा चंचल असतो.त्यास स्थिर करणे,कंट्रोल करणे हे कठीण काम माणूस करू शकते,ते त्यात असलेल्या मेंदू मुळे.मेंदूतील बुध्दी मुळे.आणि बुद्दितील विवेकामुळे.
कुटुंबातील व्यक्ती,समूहातील व्यक्ती,गावातील,जातीतील,धर्मातील,देशातील व्यक्ती ही सारखी नसतात.म्हणजे विचाराने एक नसतात.व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून व्यक्ती तितुके स्वभाव,विचार अलग अलग असतात.तरी ते एकत्र असतात.कुतुंबचाचे,समूहाचे संघटनेचे,गावाचे देशाचे म्हणजे सर्वांचे एकत्र राहणे ही काळाची गरज होऊन बसते,म्हणून माणसाने मनावर न सोडता सोपावता बुद्दीवर सोपवतो.
तेही विवेकवर म्हणूनच कुटुंबात मतभेद असूनही सहजीवन जगत असतो.अनेकांचे अनेक स्वभाव,प्रकृती,विचार असले तरी सगळ्यांची सहजीवनाची गरज लक्षात घेऊन किमान समान कार्यक्रम तयार करतात.आणि त्यावर ते ठाम राहतात.जसे की भारतात अनेक जातीचे धर्माचे पंथाचे विचाराचे लोक वास्तव्य करून असले तरी ते एकत्र राहतात,याचे कारण संविधान.आणि संविधनिक कायदे,आणि सर्व नागरिकांचा समान किमान कार्यक्रमावर एकमत.यामुळेच मतभेद ठेऊन ही मन भेद करायचा नाही.
हा दृढ संकल्प केल्यामुळेच हे शक्य झाले आहे.कुटुंबातील व्यक्तीत मतभेद असले तरी मनभेद नसतात.म्हणूनच नाती टिकतात.मग ते नाती कुटुंबातील असोत की जातीची असोत की धर्माची असोत की देशाची असोत की मैत्रीची नाती असोत.ते टिकतात केवळ माणुसकी मुळे.
माणसाला आपण माणूस आहोत जनावर नाही” याची जाणीव झाली की मग त्याला बुध्दीची जाणीव होते,आपली बुध्दी जनावरासारखी मर्यादित नाही,विचारला मर्यादा घालीत नाही,हे कळते,म्हणून माणूस जातीचा प्राणी विचारशील असतो.म्हणून सहजीवनाची कला माणसाला जमते.ती जनावराला नाही जमत.म्हणून त्यास कुटुंब घर गाव देश नसतो.माणसाला माणसाने माणसासारखे वागविले पाहिजे,असा साक्षात्कार जेंव्हा प्रत्येकाला होईल,तेंव्हाच तो माणुसकी जपू शकेल.
माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ आणि विकसित बुध्दीचे लक्षण आहे.माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म याची जाणीव होईल तेंव्हा मानवता धर्म विकसित होईल.बाकी सारे धर्म जाती आपोआपच काळाच्या पडद्याआड जातील.यासाठी एकच तत्व पाळले पाहिजे,ते म्हणजे तुकडोजी महाराजांचा उपदेश ” मतभेद होनेपर भी मनभेद हो ना पाये.”. चला तर मग आपण आपली माणुसकी जागऊ या. जाती धर्माचे आपले विचार हे खाजगी समजून सार्वजनिक जीवन हे समृध्द करू या.


