Home देशविदेश जातीचा अंत आणि वर्गाचा अंत….

जातीचा अंत आणि वर्गाचा अंत….

   जगातील सर्वच देशात गरीब मध्यम श्रीमंत असे वर्ग आहेत.गरीब वर्गात भिकारी,दरिद्री आहेत.मध्यम वर्गात क्लास वन,क्लास टू , क्लास थ्री,क्लास फोर असे चार वर्ग आहेत.श्रीमंत वर्गात कनिष्ठ व वरिष्ठ असे दोन वर्ग आहेत.

        जगातील सर्वच देशात वर्ग आहेत पण जाती नाहीत.काही मोजक्या देशात दिसून येतात.सर्वात जास्त जाती भारतात आहेत.६ हजार जातीचा हा देश त्यात परत अस्पृश्य जाती.त्यात जातीचा अभिमान.

       जगातील सर्वच देशात धर्म आहेत.काही देशात कमी जास्त आहेत.पण आहेतच.धर्माचा अभिमान साऱ्यांनाच आहे.नुसता अभिमानच नाही तर गर्व पण आहे.

         जातीचा गर्व, शधर्माचा गर्व आहे पण वर्गाचा गर्व पण आहे,मात्र तो फक्त मध्यम आणि श्रीमंत या दोन वर्गांनाच आहे,गरीब वर्गास मात्र आपल्या वर्गाचा अभिमान किंवा गर्व नाही.त्याचे कारण त्या वर्गाची हाल अपेष्टा.

        धर्मात आणि जातीत हाल अपेष्टा असतात.तरी पण त्या त्यांना मान्य असतात.त्याचे त्यांना काहीच वाटत नाही.म्हणून ते जाती अंतर्गत किंवा धर्मांतर्गत विरोध किंवा संघर्ष करीत नाहीत.संघर्ष का करीत नाहीत ? त्याचे कारण जातीचा,धर्माचा अभिमान आणि गर्व असतो,बाळगतात.

       खरे तर गर्व बाळगण्याची,करण्याची,असण्याची गरज नाही,शिवाय गर्व करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नव्हे.ते तर विकृत पणाचे लक्षण होय.विकृती म्हणजे सद्गुण नव्हे तर दुर्गुण होय.

         तरी जातीचा धर्माचा गर्व बाळगतो याचे कारण वर्गाची जाणीव लोकांना होऊ नये,याचे षडयंत्र स्वार्थी शोषक भांडवलदार करीत असतात.

       भांवलदारी व्यवस्था म्हणजे वर्गीय व्यवस्था म्हणजे नफा कमावणारी व्यवस्था टिकावी,केवळ आपणच चैनीचे जीवन जगावे या स्वार्थी हेतूसाठी जातीचा धर्माचा गर्व अभिमान लोकात रुजविणे टिकविणे चे काम हे स्वार्थी शोषक भांडवलदार करीत असतात.हा आपला स्वार्थी उद्देश उघड होऊ नये म्हणून,लोक वर्गीय संघर्ष करू नये म्हणून जाती आणि धर्म मजबूत करण्याचेही काम चालूच असते.

         संविधान कर्त्याने लोकांना असलेला जातीचा धर्माचा अहंकार स्वाभिमान आणि गर्व लक्षात घेतला.त्यांना वाटले असे असताना,जाती धर्म मजबूत असताना लोक वर्ग संघर्ष करू शकत नाहीत.भारतात तर वर्ग संघर्ष शक्यच नाही.

      कारण येथील जनतेवर जातीचा आणि धर्माचा पगडा अभिमान जास्तच आहे.म्हणून त्यांनी ” सामाजिक न्यायाची संकल्पना ” मांडली.ती म्हणजे जात म्हणून ज्या समाजावर अन्याय झाला,त्याच समाजाचा जात म्हणूनच त्यांचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण ” हा निकष लावायचा आणि सर्व भारतीय जातींचे प्रवर्ग तयार करायचे.म्हणून ए सी,एस टी,ओबीसी,अल्पसंख्याक,आणि खुलाप्रवर्ग असे साऱ्या भारतीय समाजाचे पाच वर्ग केले.

        वर्ण व्यवस्थेने ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र अतिशूद्र ( अस्पृश्य आणि स्त्रिया) असे पाच सामाजिक वर्ग केले होते,याचा अभ्यास करून संविधान करत्याने या वर्णातील स्पृश्य वर्ण म्हणजे ब्राम्हण क्षत्रिय वैश्य यांना म्हणजे या वर्णातील सर्वच जातींना ओपन प्रवर्गात आणि सर्वच अस्पृश्य जातींना आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल जातींना ओबीसी एस सी ,एस टी या प्रवर्गात टाकले.एस टी आणि मायनॉरिटी अस्पृश्य नाही पण आर्थिक दृष्ट्या मागास म्हणून त्यांना गणल्या गेले.

       ओबीसी आर्थिक दृष्ट्या मागास पण अस्पृश्य नाही म्हणून त्यांचा अस्पृष्यातून अलग प्रवर्ग केला.अशा प्रकारे एस सी,एस टी,ओबीसी,मायनॉरिटी,ओपन असे पाच प्रवर्ग करून काही मागास प्रवर्गासाठी,म्हणजे त्यांचेतील सर्व जातीस विशेष सवलती ( म्हणजे जे राजकीय आर्थिक,नोकरी ,शिक्षण यात नाहीत अशांना ) दिल्या.

        कारण हजारो वर्ष या प्रवर्गावर अन्याय झाला आहे,आर्थिक सामाजिक समतेची म्हणजे न्यायाची वागणूक वर्णसरमात जातीव्यवस्था मध्ये या जातींना मिळाली नव्हती.

       म्हणून हे मागे म्हणजे मागास राहिले.पुढच्या बरोबर या मागे पडलेल्याना आणण्यासाठी विशेष लक्ष देणे,म्हणजे विशेष सवलती देणे म्हणजे सामाजिक न्याय होय.तो संविधानाने ” आरक्षण ” या कलमाने दिला.

      आरक्षण मुळे सर्व मागास जातीतील काही कुटुंब सुधारली.आर्थिक राजकीय सैक्षणीक आरोग्य क्षेत्रात त्यांची प्रगती झाली.म्हणजे त्यांचे हे प्रश्न सुटले.

         स्वातंत्र्यानंतर या 75 वर्षात मोजकीच कुटुंबे सुधारली पण बहुतांशी तसेच राहिले.उलट महागाई,बेकारी,व्यसन,भ्रष्टाचार शिगेला पोहचला,त्यामुळे प्रत्येक जातीत वर्ग निर्माण झाले.काही लोकांना सरकारी नोकरी,कंपनीत काम या मुळे मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात तयार झाला.तरी लोकसंख्या नियंत्रण नसल्यामुळे गरीब वर्ग हा अधिकच वाढला.

        काही मोजकेच उद्योगपती व छोटे भांडवलदार झाले.आरक्षणामुळे हे वर्गीय चित्र निर्माण झाले,त्या बरोबरच जाती अजून पक्क्या झाल्या.जातीचा अभिमान अजून वाढला.धर्माचा गर्व अधिकच दृढ झाला.अर्थात आरक्षण हे धोरण धर्माभिमान वाढीस कारणीभूत नाही,तरी पण असे घडले.मात्र जातीचा आणि वर्गाचा अंत होण्या ऐवजी त्यांचे अस्तित्व अधिकच दृढ झाले.नव्हे,पूर्वीपेक्षा वाढले.

        यात गंमत अशी की,जाती धर्माचे महत्त्व वाढल्या मुळे वर्गाची अस्मिता वाढली नाही.उलट ती घसरली.म्हणून आरक्षण हे वर्गलढ्यास बाधक ठरले.तरी हरकत नव्हती,परंतु आरक्षण देऊन वर्गीय अंतर कमी करण्याचे संविधानाचे स्वप्न अधुरेच राहिले.

       खरे तर भारतीय समाजव्यवस्था जतीयत्ता मुळे वर्गलढे यशस्वी होणार नाहीत,म्हणून तर आर्थिक न्याय ” म्हणून आरक्षण च विचार झाला,पण प्रयोगांती तो सामाजिक असो की आर्थिक समतेचे स्वप्न साकार करेल असे या 75 वर्षाच्या अनुभवातून दिसून येते.शेवटी जाती अंत आणि वर्ग अंत.आणि त्यांच्या लढाया अधुऱ्या च राहिल्या असेच म्हणावे लागते.

        आणि परत आर्थिक व सामाजिक समतेसाठी जिथून प्रवास सुरू झाला,तेथूनच परत प्रवासास सुरुवात करावी लागेल.कारण शोषणमुक्त भारत,आणि केंद्रीकरण मुक्त शासन ,विवेकनिष्ठ समाज,विज्ञाननिष्ठ समाज हे स्वप्न संविधानाचे आहे.ते कसे साध्य करायचे ? यावर चिंतन होण्याची गरज आहे.

         लेखक :- दत्ता तुमवाड

            सत्यशोधक समाज नांदेड…

                 दिनांक: 5 मार्च 2025.

                     फोन: 9420912209.