Home देशविदेश महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाला भारत सरकार आणि बिहार राज्याचे सरकार घाबरले काय?...

महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाला भारत सरकार आणि बिहार राज्याचे सरकार घाबरले काय? — भारताची मान जगात खाली पडेल असे,”महाबोधी महाविहाराच्या अंदर,ब्राह्मण पुजाऱ्यांच्या द्वारे विकृतीकरण..‌ — शांततेत आंदोलन करणाऱ्या बौध्द भिख्खूंना रात्रोला अटक करण्याचे उचित कारण जगा समोर यायला हवे…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

      प्रियदर्शि राजा सम्राट अशोक यांनी ई.स. ५ व्या,”वा, ६ व्या शतकात बिहार राज्यांतर्गत बुध्दगया येथे बांधलेले महाबोधी महाविहार हे केंद्र सरकार सरकारच्या धोरणानुसार (नियमानुसार) ब्राह्मण पुजाऱ्यांच्या कब्जात असल्याने या महाबोधी महाविहारात त्यांच्याकडून विद्रुपीकरण सुरु आहे.

            जागतिक पातळीवरील महाबोधी महाविहारात विद्रुपीकरण करण्याचे सुरु असलेले कटकारस्थान,”भारताला जगात लाजवेल,अशा भयंकर मोठ्या कुटनितीचा महाबोधी महाविहारातील विद्रुपीकरणाचा घटनाक्रम आहे.

         महाबोधी महाविहार भारतासह जगातील बौध्द बांधवांचे श्रध्दास्थान आहे व वैचारिक प्रेरणास्थान आहे.तद्वतच प्रत्येक नागरिकाला चिरित्र्यसंपन्नतेचा संदेश देणारे चार आर्यसत्या सह महा-विचारांचे बलस्थान आहे.

 

         म्हणूनच भारत देशासह जगातील पर्यटक आणि जगातील बौध्द विचारवंत/बांधव दरवर्षी करोडोंच्या संख्येने या महाबोधी महाविहाराला कोटी कोटी वंदन करण्यासाठी येतात आणि या महाबोधी महाविहाराच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात देणग्या देतात.

       मात्र त्या देणग्यांचा हिशोब तेथील ब्राह्मण पुजारी देत नाही आणि महाबोधी महाविहारांचा विकास सुध्दा ते करीत नाही.यामुळे महाबोधी महाविहाराला देणग्याच्या स्वरूपात येणारे करोडो रुपये कुठे जातात? हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

          ब्राह्मण पुजाऱ्यांच्या कब्जात महाबोधी महाविहार असल्याने,”तथागत भगवान गौतम बुद्धांचे,”मानव विकास बाबतीतल्या सखोल धम्म विचारांचा व त्यांचा सांस्कृतिक वारसांचा जगातील व भारतातील नागरिकांना सदोपयोग होत नाही हे वास्तव आहे.

           महाबोधी महाविहारात ब्राह्मण पुजाऱ्यांचा कब्जा म्हणजे देशातील बहुजन नागरिकांना गुलाम बनविणाऱ्या मनुवादी संस्कृतीची पुनरावृत्ती होय असे एकंदरीत दिसून येते आहे.

         ब्राह्मण अर्थात मनुवादी विचाराने आणि संस्कृतीने या देशातील नागरिकांना हजारो वर्षे गुलाम आणि लाचार करून ठेवले होते हा इतिहास ताजा असताना त्याच विचारांची पुनरावृत्ती त्यांच्या अनेक मेळाव्यातून होणे म्हणजे भारत देशातील बहुजन नागरिकांना लवकरच गुलाम बनविणारी आहाट आहे काय? यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.असे असेल तर या आहाटला पुर्णतः थोपविण्यासाठी परत एकदा भारत देशात विशाल क्रांती होणे अती गरजेचे आहे.

          मनुवादी संस्कृतीला व विचारांना रोखण्यासाठी भारत देशातंर्गत बिहार राज्यातील बुध्दगया येथे,”महाबोधी महाविहार मुक्त,आंदोलन अनेक बौद्ध भिक्खू अन्नाचा एक कन न खाता शांततेत करीत आहेत.अर्थात अशा आंदोलनाला भारत देशात,”आमरण उपोषण, असे म्हणतात.. महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाचा १६ वा दिवस आहे.

         महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाला जगातून मिळणारा पाठिंबा बघता,या शांतमय आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी भारत सरकार व बिहार राज्याचे राज्य सरकार अस्वस्थ असणारच!..

          यामुळे बिहार राज्याच्या पोलिसांनी रात्रो १ वाजताच्या दरम्यान,”बौध्द भिख्खूंना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरुन स्थानबद्ध केले असल्याच्या बातम्या,भारतासह जगात पोहोचलेल्या आहेत.

          मात्र बिहार राज्य पोलिसांनी आंदोलन स्थळावरुन बौद्ध भिक्खूंना स्थानबद्ध केल्यानंतर १६ बौध्द भिख्खूचा पत्ता लागत नसल्याने अख्ख्या जगातील बौध्द नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

             महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाला भारत सरकार द्वारे आणि बिहार राज्य सरकार द्वारे चिरडून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांची दडपशाही नव्हे काय?

        भारतीय संविधानाने सर्वांना आपापल्या धर्मानुसार धर्म स्वातंत्रता आणि धर्म समानता दिली असताना महाबोधी महाविहारात ब्राह्मण पुजाऱ्यांचे कोणते काम आहे? आणि हे महाबोधी महाविहार भारत सरकार बौद्धांच्या ताब्यात का म्हणून देत नाही? याचबरोबर महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंबंधाने,”भारत सरकारला,कशाची भिती आहे?हे तर जगा समोर यायलाच पाहिजे…