Home Maharashtra डॉ.शिल्पा चिटणीस यांच्या “तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज” या पुस्तकाचे प्रकाशन…

डॉ.शिल्पा चिटणीस यांच्या “तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज” या पुस्तकाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : डॉ.शिल्पा चिटणीस जोशी लिखित “तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज” हे पुस्तक स्त्रीयांना जेवढे आवश्यक आहे तेवढेच ते पुरषांनी सुध्दा वाचले पाहिजे जेणे करुन स्त्रीयांच्या आरोग्याची काळजी अधिक घेतली जाऊ शकते असे प्रतिपादन डॉ.आशुतोष जावडेकर यांनी व्यक्त केले.

          बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित व‌ डॉ.शिल्पा चिटणीस जोशी लिखित “तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज” भाग १ ते ३ चे प्रकाशन सोहळा डॉ.भुषण शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी डॉ.आशुतोष जावडेकर, बुकगंगाचे मंदार जोगळेकर, सुप्रिया जोगळेकर लिमये, गौरी जोशी तसेच विविध तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

           स्त्रीयांमधील अनेक आजारावरील प्रश्नांची उत्तरे हे डॉ.शिल्पा चिटणीस जोशी लिखित “तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज” या पुस्तकात मिळतील प्रत्येक कुटुंबात हे पुस्तक असणे आवश्यक आहे. असे मनोगत डॉ.भुषण शुक्ल यांनी व्यक्त केले.

         स्त्री रुग्णांना त्रास का होतोय, हा होऊ नये म्हणून काय करता येईल तसेच औषधं नक्की कशी परीणाम करतील अशा असंख्य शंका त्यांच्या मनात असतात. या सगळ्या शंका-कुशंकांचे समाधान करता यावे आणि सतत गुगल करणाऱ्या लोकांना शास्त्र शुध्द माहीती द्यावी हा या पुस्तकाचा उद्देश आहे असे पुस्तकाच्या लेखिका डॉ.शिल्पा चिटणीस-जोशी यांनी सांगितले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक मंदार जोगळेकर, सुत्रसंचालन ऋतुजा फुलकर यांनी तर आभार गौरी जोशी यांनी मानले.