Home Crime वाळू भरलेले ट्रॅक्टर टालीसह पकडले,चिमूर पोलिसांची कारवाई… — गुन्हा दाखल,मौजा नेरी...

वाळू भरलेले ट्रॅक्टर टालीसह पकडले,चिमूर पोलिसांची कारवाई… — गुन्हा दाखल,मौजा नेरी येथील आरोपी…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

          वाळू चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव आणि त्यांची चमू सज्ज झाली असल्याने काल वाळू भरलेले एक ट्रॅक्टर टालीसह पोलीस स्टेशन चिमूर मध्ये त्यांनी जमा केले.

        उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय चिमूर येथे कार्यरत असलेले पोहवा श्री.गणेश नामदेव मेश्राम यांनी सरकार तर्फे वाळू चोरीची तक्रार दाखल केली.

          तक्रारीचा अपराध क्रमांक ०९/२०२५ असून भांदवी कलम ३०३(२),३(५),बि.एन.एस.मोवाका १३०(१),१७७,अंतर्गत वाळू चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             वाळू चोर ड्रायव्हर जगदीश ढोणे वय २२ वर्ष,स्वप्निल विलास जिवतोडे वय २० वर्ष (मजूर) हे दोघेही मौजा नेरी येथील रहिवासी आहेत.

           चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गस्तीवर असताना त्यांना भुराजी देवस्थान टी पाईंट नेरी येथे वाळूने भरलेली ट्रक्टरटाली दिसली.सदरची घटना काल सकाळी चाडेचार ते साडेपाच वाजताच्या दरम्यानची आहे.

        त्या ट्रक्टरटाली चालकाकडे वाळू उपसा लिज परवाना नसल्याने सदर चालकावर आणि मजूरावर विविध कलमान्वये फौजदारी कारवाई करण्यात आली.ट्रॅक्टर मुंडा निळ्या रंगाचा असून टाॅली लाल रंगाची आहे.ट्रक्टर मुंडा आणि टाॅलीची एकून किंमत ७ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

          सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या प्रत्यक्ष उपस्थित करण्यात आली.यावेळी पोहवा श्री.गणेश नामदेव मेश्राम,पोशि.रमेश हाके सोबत होते.