Home Maharashtra मासळ येथे बिरसा मुंडा जयंती संपन्न…

मासळ येथे बिरसा मुंडा जयंती संपन्न…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :-

       ग्रामपंचायत मासळ (बुज.) येथे ‘धरती आबा’ जल,जमीन आणि जंगलांच्या संवर्धनासाठी झटणारे,आदिवासी समाजाला संघटित करून स्वातंत्र्याचा लढा पुकारणारे,आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे,थोर स्वतंत्रता सेनानी आदिवासींच्या जल,जंगल आणि जमीन यासाठी इंग्रजांविरुध्द प्रखर संघर्ष करणाऱ्या आदिवासींचे महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांतर्फे अभिवादन करण्यात आले…

           या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी केशव गजभे,अंगणवाडी सेविका शोभा रमेश गायकवाड,निशा प्रकाश पाटील,शिलाबाई कचरू धारणे ग्रामपंचायत शिपाई रवींद्र दडमल,सुनील सुर उपस्थित होते.