Home Maharashtra सम्यक बौध्द विहार देलनवाडी येथे धम्म प्रवर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन…

सम्यक बौध्द विहार देलनवाडी येथे धम्म प्रवर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन…

अनिलकुमार एन.ठवरे

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली 

         दखल न्यूज भारत 

          देलनवाडी :- ६८ व्या धम्म प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सम्यक बौध्द विहार देलनवाडी येथे सात दिवसीय धम्म प्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

           आबाल – वृद्ध व सर्वांना धम्माविषयी ओढ निर्माण व्हावी व त्यांच्या मध्ये जागृतता निर्माण व्हावी या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

            या प्रसंगी सकाळी बुध्द वंदना दुपारला धम्म चर्चा सायंकाळला परत बुध्द वंदना व रात्रोला बुध्द आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करण्यात येत आहे.

          त्याच बरोबर मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.