कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत गहु-हिवरा रोड वर वेकोलीच्या खुली कोळसा खदान कडुन टेंडर द्वारे दगडी कोळसा घेण्याचा नावावर,”अवैध चोरीचा दगडी कोळसा,”खरेदी-विक्री करणाऱ्या टालवर,कन्हान पोलीसांनी धाड मारुन पाच युवकांना ताब्यात घेऊन सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.६) ऑगस्टला सकाळच्या सुमारास कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि,रोहित चौरसिया याचा गहु-हिवरा रोड वरील टालवर वेकोलीच्या खुली खदान मधुन माती मध्ये डम्पींगचा कोळसा चोरला जातो व बोरी मध्ये भरून दुचाकी वाहनावर खरेदी-विक्री मागील काही दिवसा पासुन केला जातोय अशी माहिती मिळाली.
सदर माहितीच्या आधारे पोलीसांनी टालवर छापा मारला असता पाच दुचाकी वाहनावर दगडी कोळसा बोऱ्यात बांधलेला मिळून आला.

बाजुला इलेक्ट्रीक वजन काटा दिसुन आला.कन्हान पोलीसांनी १) रोहित सुर्यवंशी वय १९ वर्ष, २) अरुण कश्यप वय २१ वर्ष, ३) पुतन केवट वय १८ वर्ष, ४) गुलशन मेश्राम वय २५ वर्ष चौघेही रा. खदान आणि ५) संजय सिंगणे वय ४० रा. गोंडेगाव यांना ताब्यात घेतले व त्यांचा जवळुन एम एच ४० सीव्ही ३३४९ , एम एच ४० सीव्ही १८९६, एम एच ४० एस ०६०९ , एम एच ४० यु २८७३, एम एच २७ डी एन ८७०५ अशा पाच दुचाकी वाहन आणि दगडी कोळसा,असा ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वेकोलीचच्या कामठी खुली खदानचे सुरक्षा रक्षक जितेंद्र राजेंद्रसिंह चव्हान वय २८ वर्ष रा. कामठी यांचा तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहेत.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक उमेश पाटील,सपोनि राहुल चव्हाण,अमोल नागरे,प्रशांत रंगारी,महेश बिसेन,हरिष सोनभद्रे,सचिन वेळेकर,अश्विन गजभिये सह पोलीस कर्मचारी यांनी यशस्विरित्या पार पाडली.


