Home Maharashtra चिमूर वरून तळोधी जाणारी बस पलटी..  — सोनापूर-येनोली तलावा जवळील घटना..

चिमूर वरून तळोधी जाणारी बस पलटी..  — सोनापूर-येनोली तलावा जवळील घटना..

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

 चिमूर :-

        आगाराची बस चिमूर वरून दुपारी 12-30 वाजताच्या दरम्यान नेरी वैजापूर मार्गे तळोधी ला जात असतांना,”सोनापूर येणोली (माल) गावा जवळील तलावाच्या बाजुने बस क्रमांक MH.40,Y.5267 ही बस 1 वाजताच्या दरम्यान ब्रेक मारल्याने रस्त्यावरुन घसरून पलटी झाली.

       या बस मध्ये 13 प्रवासी प्रवास करीत होते.या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसुन सर्व प्रवासी सुखरुप बस मधून बाहेर निघाले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.