Home Maharashtra सोनसरी येथील महिला पोलीस पाटीलवर हल्ला करणे भोवले…   — दोघांची...

सोनसरी येथील महिला पोलीस पाटीलवर हल्ला करणे भोवले…   — दोघांची कारागृहात रवानगी..

           राजेंद्र रामटेके

ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

        तालूक्यातील सोनसरी येथील महिला पोलीस पाटील याना कर्तव्य बजावत असताना मज्जाव करीत व हूज्जत घालत मारहाण करणा-या दोन आरोपीना अटक करण्यात आली व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. 

          सोनसरी येथील तलावात मागील महिण्यात एका इसमाचा बूडून मृत्यु झाला होता,सदर माहिती मिळताच महिला पोलीस पाटील वालदे व कोतवाल फिरोज हलामी घटणास्थळाकडे जात असताना गावातीलच आरोपी दिलीप बाबूराव मडावी वय ४१ व महेश दिलीप मडावी वय २२ या बापलेकानी तिला रस्त्यातच गाठत ‘तू गावातील माहीती पोलीसाना देते ‘असे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळ करीत मारहाण केली.

       त्या संबंधाने पोलीस पाटील वालदे यांनी कूरखेडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

        या तक्रारीवरून आरोपी विरोधात भादंवी ३५३,३३२,२९४,५०४,३४ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला होता.मात्र आरोपी फरार होते, सदर आरोपींचा गोपनीय माहीती आधारे शोध घेत अटक करण्यात आली व न्यायालयात हजर करण्यात आले.

         न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडी अंतर्गत चंद्रपूर कारागृहात केली आहे.सदर कार्यवाही ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे,हवालदार शेखलाल मडावी यानी केली.