Home देशविदेश देवळे आणि विद्यालये..

देवळे आणि विद्यालये..

 

   विद्यालयाच्या जागेपायी, 

कुणीच इथं भांडलं नाही..

  अन्..देवालयाच्या जागेसाठी

रक्त इथं कमी पडलं नाही..

 — माझाच देव मोठा म्हणण्यात,              

रक्ताच्या नद्या वाहील्या… 

     ज्ञानगंगा कोरडी पडत,

ओसाड शाळा झाल्या…

   — शाळा अजुनही तशीच,

पडक्या,तुटक्या भिंतीची….

    गरीब माझ्या देशामधली,

मंदिरं उभी सोन्याची…

  — धर्मासाठी,पैशांसाठी,

आंदोलने अनेक पाहिली…

पण शिक्षणाच्या भल्यासाठी,

 कुणी ग्वाही दिलीच नाही…

    — शाळे मधली दानपेटी,

भरलेली कधी पाहिली नाही..

   अन् मंदिराची दानपेटी,

रिकामी कधी दिसली नाही…

 — शाळेतला पालक मेळावा,

पालकांवाचून राहून गेला…

     देवालयात चेंगराचेंगरीत,

माणुस मात्र तुडवून मेला…

   — विद्येचं ज्ञान देऊन,

गुरूजी गरीबच राहीला..

 अन् ‘अंधभक्तांचं’ दान घेऊन,

 पुजारी बराच धनवान झाला…

— खरंतर धर्म नावाचं पुस्तक,

     शाळेत कधीच उघडत नाही..

अन् धर्माच्या नावाशिवाय,

    देशात पानही हालल नाही..!

“देशात पानही हालल नाही…!!

*** 

              लेखक

                अजय तुम्मे

                संस्थापक अध्यक्ष 

माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य…