भारत मुक्ती मोर्चा द्वारा ईव्हीएम मशीन विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगावर महामोर्चा.. — जंतरमंतरवर एकवटला विशाल जनसमुदाय… — देशभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

          ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका पारदर्शक,भिती मुक्त आणि विश्वसनीय होत नसल्यामुळे,भारत देशांतर्गत सर्व निवडणुका मतपत्रिका द्वारा घेण्यात याव्यात यासाठी भारत मुक्ती मोर्चा द्वारा दिल्ली येथील केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगावर आज प्रचंड महामोर्चा नेण्यात येणार आहे.

         यासाठी देशभरातील लाखो नागरिक,मतदार,भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी व सदस्यगण,विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी जंतरमंतरवर पोहोचले आहेत.

       ईव्हीएम मशीन म्हणजे आधुनिक काळातील मनुस्मृती आहे.ही मनुस्मृती बहुजन समाजातील नागरिकांचे अधिकार प्रभावहीन करुन त्यांना मानसिक गुलाम करीत आहे.

        तद्वतच ईव्हीएम मशीन लोकशाहीला घातक असून देशातील ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,एनटी,व्हिजेन्टी, विशेष मागासवर्गीयांच्या अधिकारांवर टाच आणणारी व अंकुश लावणारी ठरली आहे.

          २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकांचा उपयोग करण्यात आला नाही तर लोकशाहीला मारक असलेल्या आणि बहुजन समाजातील नागरिकांच्या प्रत्येक अधिकाराला प्रत्यक्ष डावलणाऱ्या केंद्र सरकार स्थांनी भांडवलदार व ब्राह्मणवादी (मनुवादी) विचारांचे सरकार पुनश्च येवू नये म्हणून देशातील सर्व बुथ केंद्रावरील ईव्हीएम मशीन तोडल्या जातील असा इशारा भारत मुक्ती मोर्चा द्वारा केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे.

         आणि देशभरातील सर्व बुथ केंद्रांतर्गत ईव्हीएम मशीन तोडणाऱ्या व फोडणाऱ्या सर्व कायदेशीर परिस्थितीला केंद्रीय निवडणूक आयोग जबाबदार राहील असे स्पष्ट केले आहे.

           ईव्हीएम मशीन द्वारा मतांची चोरी करून मनुस्मृतीच्या नियमानुसार वर्णवादी व्यवस्थेला महत्व देणारे ब्राह्मणवादी विचारसरणीचे भाजपा सारखे बहुजन विरोधी सरकार आता या पलीकडे केंद्रात नकोय,या संबंधाने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दक्षता घेतली आहे.