दहेगाव जोशी महावितरण अंतर्गत लघुदाब वाहीनीचे साहित्य गेले चोरीला… — पोलिसात गुन्हा दाखल.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

            पाराशिवनी:- पोलिस स्टेशन पारशिवनी अंतर्गत दहेगाव जोशी महावितरण आहे.या महावितरण परिक्षेत्रातून लघुदाब वाहिनीचे साहित्य चोरीला गेले असल्याची घटना घडली आहे.

            लघुदाब वाहिनीचे साहित्य चोरी प्रकरणी पारशिवनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         पो.स्टे. पारशिवनी अंतर्गत १४ किमी अंतरावर मौजा शेत शिवार येथे दिनांक बुधवार २६/१०/२०२३ ते गुरुवार दि.२७/१०/२०२३ चे ०२.०० वा. दरम्यान महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.उपविभाग पारशिवनी यांचे लघुदाब वाहीनीचे १) ए.एन.टी. कंडक्टर १२६० मीटर किंमती २९२३२ /- रू २) जि.एन.ए. टी कंडक्टर ४२० मिटर किंमती ५१५८/- रू सिमेंट पोल ०१ नग किंमती २३७६ /- रू अशा एकुण ३४३९० /- रू चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले आहे..

           सदर प्रकरणी फिर्यादी नामे- महेंद्र काशिराम हेडाऊ (कनिष्ठ अभियंता) वय ४५ वर्ष, रा. दहेगाव जोशी महावितरण कार्यालय पारशिवनी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. पारशिवनी येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३७९, ४२७ भादंवी कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. 

           अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनी आकरे हे करीत आहेत.