गोविंदपुर जिल्हा परिषद मराठी शाळेत शाळा पुर्व तयारी कार्यक्रम संपन्न..

 

कैलास गजबे – करजगाव 

    जिल्हा अमरावती 

         जिल्हा परिषद मराठी शाळा गोविंदपुर येथे शाळा पुर्व तयारी कार्यक्रम काल घेण्यात आला.

      या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गोविंदपुर येथील सरपंच सचिन सोलव,प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख महेंद्रजी हिवेसर,प्रमुख अतिथी म्हणून एकनाथराव गजबे सर होते.

       सेवानिवृत्त मुख्याध्यापक एकनाथराव गजबे सर व ग्रामपंचायत गोविंदपुर सरपंच सचिन सोलव यांचा केंद्र प्रमुख महेंद्रजी हिवेसर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.तसेच महेंद्रजी हिवेसर यांचा सत्कार आशिष चौधरीसर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून करण्यात आला.

        केंद्र प्रमुख महेंद्रजी हिवेसर यांनी मुलांना आपल्या भाषणात खेळा विषयी व शाळे विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

       एकनाथराव गजबे सर यांनी आपल्या भाषनात शिक्षणाविषयी व जिल्हा परिषद शाळेविषयी मोलाची माहीती सांगीतली.अध्यक्षीय भाषनात गोविंदपुर ग्रामपंचायत सरपंच सचिन सोलव यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेला काही कमी पडु देणार नाही व शाळा सुंदर बनविण्याकरीता अधिक प्रयत्न करील असे मार्गदर्शनपर सांगितले.

     या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षिका सौ.कविता राठोड,शाळा समिती अध्यक्ष योगेश सोलव, ग्रामपंचायत सदस्य सौ.ज्योती धामडे,पत्रकार कैलास गजबे अंगनवाडी सेविका,मदतनिस, माता पालक विघार्थि या कार्यक्रमाला हजर होते सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आशिष चौधरीसर यांनी केले कार्यक्रमाची सांगता चहापाण्याने झाली.