प्रज्ञा विकास सार्वजनिक वाचनालय येथे ७४ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा…

ऋषी सहारे

  संपादक

     खापरखेडा :- प्रज्ञा विकास सार्वजनिक वाचनालय, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ नोव्हेंबर २०२३ला सायंकाळी:०६:३० वाजता प्रज्ञा विकास सार्वजनिक वाचनालय,प्रकाशनगर,खापरखेडा येथे विलास उके , अधिक्षक अभियंता, औ.वि.कें.खापरखेडा यांच्या अध्यक्षतेत, प्रमुख उपस्थिती म्हणून नितीन काळे , सहाय्यक महाव्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, औ.वि.कें.खापरखेडा, यशवंत झोडापे व त्याच बरोबर वसाहतीतील, बाहेरील मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

            कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देशिकेच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण, अगरबत्ती, मेणबत्ती प्रज्वलित करून करण्यात आली.

            यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन नंतर मान्यवरांचे व उपस्थित नागरिकांचे भारतीय संविधान काळाची गरज याविषयावर मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोरेश्वर लाडे यांनी केले, प्रास्ताविक मंगेश शेगोकार तर आभार माधवी शेगोकार यांनी मानले.