बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
निरा नरसिंहपुर,तालुका इंदापूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष्मी नरसिंह नगरीत आगमन होताच क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले कुलदैवत श्री.लक्ष्मी नरसिंह चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
देवस्थानचे मुख्य विश्वस्त व ट्रस्ट सर्व पुजारी यांच्या उपस्थितीत लक्ष्मी नरसिंहाच्या चरणी अभिषेक व पूजा करण्यात आली,देवस्थानच्या वतीने मानाची पगडी श्रीफळ शाल आणि महाप्रसाद देऊन देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच नरसिंहपूर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नितीन सरवदे,विद्यमान सरपंच अर्चना नितीन सरवदे यांनी सुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मी नरसिंह चरणी नतमस्तक होऊन म्हणाले की माझा शेतकरी राजा सुखी व समृद्धी राहू दे,निसर्ग राजाने चांगली साथ देऊ दे व उद्याचा गुढीपाडवा आनंदाने गोड होऊ दे म्हणून लक्ष्मी नरसिंह चरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी साखडे घातले.
या निमित्त प्रमुख उपस्थिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वासिम जिल्ह्याचे पालकमंत्री व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर,दौंडचे आमदार राहुल कुल,माजी आमदार राम सातपुते,पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील,सुलोचना देवी धवलसिंह मोहिते पाटील,माऊली चौरे प्रदेश भाजप कार्यकारणी सदस्य, सुनील फुलारे पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर,पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,तसेच इंदापूर तालुक्यातील पोलीस निरीक्षक सह सर्व अधिकारी,महावितरण कंपनीचे अधिकारी,बांधकाम विभागाचे अधिकारी,आरोग्य विभाग सर्व अधिकारी,इंदापूर,माढा,माळशिरस या तीन तालुक्यातून आलेले सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते
तसेच नरसिंहपुरचे विद्यमान सरपंच अर्चना सरवदे,सरपंच नितीन सरवदे,उपसरपंच गुरुदत्त गोसावी,माजी सरपंच नरहरी काळे,माजी सरपंच विलास ताटे,माजी सरपंच संतोष मोरे,उधोजक सागर इंगळे,माजी सरपंच आण्णासाहेब काळे,उद्योजक विजय सरवदे,तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत,माजी सरपंच श्रीकांत दंडवते, माजी सरपंच चंद्रकांत सरवदे,सतीश बलभीम काकडे,सहीत सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आजी-माजी सरपंच उपसरपंच व सर्व नरसिंहपूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय दुनाके सर यांनी केले तर देवस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.
चौकट…
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून लक्ष्मी नरसिंहाला केलेला नवस सतीश बलभीम काकडे संगम तालुका माळशिरस येथील यांनी 251 नारळ,तुळशीचा हार, व 5 किलो पेढे देवस्थानला अर्पण करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलेला नवस फेडण्यात आला…



