Home Maharashtra महाराष्ट्र राज्यातील सर्व पिक उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने सरसकट...

महाराष्ट्र राज्यातील सर्व पिक उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने सरसकट द्यायला हवी… — ओल्या दुष्काळाचे संकट भयंकर गंभीर!…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक…

        अतिवृष्टीमुळे कपाशीचे आणि सोयाबीनचे पिक चौपट झाले असून धान उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला आहे.याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील इतर सर्व पिकांवर अतिवृष्टीचा गंभीर परिणाम पडला आहे.

        तद्वतच अतिवृष्टीमुळे धानाचे उत्पादन अर्ध्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.तद्वतच सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांची दैन्यावस्था झाली आहे.

          याचबरोबर कपाशीचे पीक आणि सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे चौपट झाले असल्याने दोन्ही प्रकारचे पिक घेणारे उत्पादक शेतकरी कंगाल झाले आहेत.

           अतिवृष्टीमुळे धान उत्पादनाची अर्धापेक्षा कमी उत्पादन क्षमता झाली आहे आणि सोयाबीन,कपाशीच्या पीकांसह काही पिके चौपट झाले आहेत.यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कंगाल झाले असल्याने त्यांच्यापुढे अनेक समस्यांचा डोंगर आतापासूनच उभा ठाकला आहे.

         वर्षभर जगायचे कसे?घरातील मुलभूत समस्यांना पुढे जायचे कसे? मुलांचे-मुलींचे शिक्षण करायचे कसे? नाते गोते सांभाळायचे कसे? नात्यातील कार्यक्रमाला जायचे कसे?अंगावर कपडे टाकायचे कसे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत…

          अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक हानीची नुकसान भरपाई देताना महाराष्ट्र सरकारने भेदभाव करु नये आणि भेदभाव करुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये,असे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

       यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,कृषीमंत्री भरणे यांनी सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने संवेदनशील होणे गरजेचे असल्याचे दिसून येते आहे.