छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाद्वारे क्षेत्रभेट व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम..

युवराज डोंगरे/खल्लार

  छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा अर्थशास्त्र विभागाद्वारे आयोजित क्षेत्रभेट व व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक 27 एप्रिल ला कृषी सहयोग शेतकरी उत्पादन कंपनी लिमिटेड व विश्वास इंडस्ट्रीज आसेगाव पूर्णा येथे पार पडले.

 या क्षेत्रभेटीमध्ये सुरुवातीला व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर आशिष काळे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी सहयोग कंपनी लिमिटेडचे संचालक व व्यवस्थापक निलेश खोंडे हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना भावी पिढी ला स्वयंरोजगार निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य विकसित करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या दाल मिल उद्योगाची माहिती देऊन दाल मिल मध्ये उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री तिचे काम करण्याची प्रक्रिया समजावून सांगून दाडीची विक्री पद्धत समजावून सांगितली व नोकरीच्या मागे न लागता आपण लोकांना रोजगार देणारे बनलो पाहिजे ही भूमिका स्पष्ट केली

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रविंद्र इचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीए भाग दोन चा विद्यार्थी विवेक धाकडे यांनी केले आभार प्रदर्शन बीए भाग दोन ची विद्यार्थिनी कुमारी सिद्ध सोळंके हिने केले या कार्यक्रमाला अर्थशास्त्र विभागाचे सर्वच विद्यार्थी उपस्थित होते.