नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांचेवर गुन्हा दाखल व अटक..

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी

         शासनाच्यावतीने सिंदेवाही येथे सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध दर्शवून शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍या सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची घटना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडली.

         नगराध्यक्षला अटक होताच मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशन मध्ये कांग्रेस कार्यकर्तेचा जमाव होऊन काही काळासाठी तनाव निर्माण झाला होता.

         प्रजासत्ताक दिन असल्याने येथील न्यायाधीश बाहेर गावी गेले असता रात्री उशिरापर्यंत जमानत होऊ शकली नव्हती . 

         सविस्तर वृत्त असे की सरकार तर्फे राबविलेल्या शासकिय योजनांची माहीती नागरिकांना व्हावी म्हणून शासनातर्फे विकसीत भारत संकल्प यात्रा ही मोहीम राबविण्यात येत आहे.सदर मोहीमेत योजनांची माहीती देणेसाठी शासकिय अधिकारी हे चित्ररथासह येत असतात. 

        सदर कार्यक्रमास कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संरक्षण देण्यात यावे याबाबतचे पत्र पोस्टे ठाणेदार यांना संवर्ग अधिकारी,पंचायत समिती सिंदेवाही नगर पंचायत,सिंदेवाही यांचेकडुन दिलेले होते.

         त्यामुळे सदर संकल्प यात्रा कार्यक्रम हा दि. 24.01.24 रोजी नगर पंचायत, सिंदेवाही चे आवारात घेण्यात येणार असल्याने ठाणेदार यांचे आदेशाने सागर महल्ले व अंडेलकर,रणधिर मदारे वपोशि सत्यवान अशांची दुपारी २ वाजताचे पासुन नंगरपंचायत सिंदेवाही येथे विकसीत भारत संकल्प यात्रा अभियानच्या बंदोबस्त कामी ड्युटी लावण्यात आली होती.

          सर्व पोलीस स्टाफ ठीक 2 वाजता नगर पंचायत,सिंदेवाही येथे कार्यक्रम ठिकाणी हजर होते.सदर ठिकाणी नगर पंचायत सिंदेवाही येथिल सुरज गायकवाड व ईतर कर्मचारी हजर होते. 

     सदर ठिकाणी शासकिय अधिकाऱ्यांसह LED स्क्रीन व बॅनर असलेले वाहन हे सदर ठिकाणी उभे करण्यात आले होते.सदर वाहनावर भारत सरकार यांचेकडुन नागरिकांसाठी राबविलेल्या शासकिय योजनांची माहीती देणेकरीता LED स्क्रीन व बॅनर लावण्यात आलेले होते.

         सदर कार्यक्रम शांततेत सुरु असतांना 3 वाजताचे सुमारास सुरज गायकवाड,लेखाधिकारी नगरपंचायत सिंदेवाही हे शासकिय योजनांची माहीती देत असतांना सदर ठिकाणी स्वप्नील योगिराज कावळे, नगराध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही यांनी अचानक येवुन सुरज गायकावाड यांच्या हातातील माईक जबरदस्तीने हिसाकावुन घेतला.

        त्यांनतर त्यांनी संकल्प रथाचे वाहनावर चढून शासकिय योजनांची माहीती असलेले पत्रके काढुन घेवुन तुम्ही बॅनरवर माझे नाव येथे कसे लिहले माझे नाव लावण्याचा तुम्हाला काय अधिकार,तुम्हाला कार्यक्रम करायचा असल्यास तुम्ही दुसरीकडे जावुन कार्यक्रम करा, येथे कार्यक्रम केला तर मी तुम्हाला पाहुन घेतो असे म्हणुन त्यांनी सुरज गायकवाड यांचे सोबत वाद घालु लागले. 

         तेव्हा सुरज गायकवाड यांना नगराध्यक्षांना म्हटले की, ” तुम्ही शासकिय कामात जबरदस्तीने अडथळा निर्माण करीत आहात”. तसेच सुरज गायकवाड पोलीस कर्मचारी यांना उद्देशून म्हटले की,”तुम्ही साहेब काय पाहुन राहीले,शासकिय योजनेत असे करुन शकते काय?बाजुला घ्या यांना?सगळे काय करता तुम्ही?कशाला आहे? बघ्याची भुमीका घेवुन राहीले का? सदर ईसम हे जबरदस्ती करुन शासकिय कामात व्यत्यय आणत आहेत ” असे ते म्हटल्याने पोशि / रणधिर मदारे हे त्यांना रोखण्यासाठी गेले असता नगराध्यक्ष स्वप्नील योगिराज कावळे यांनी त्यास ढकलुन बाजुला केले व तुम्ही मध्ये पडु नका तुम्हाला पण पाहतो असे म्हणाला. 

         तेव्हा लागलीच पोलीस कर्मचारी स्टाफ यांनी येवून स्वप्निल कावळे यास बाजुला करुन त्यांना तेथुन बाहेर नेले.

 त्यांनतर कार्यक्रम संपल्यानंतर सदर घटनेची माहिती सागर महल्ले सहा पोलीस उपनिरीक्षक यांनी वरिष्ठांना सांगितली.सदर घटनेची पुनश्च चौकशी करुन घटनेची शहानिशा केली व नगराध्यक्षवर गुन्हा दाखल करून प्रजासत्ताक दिनी दहाच्या सुमारास अटक केली.

        सदर घटनेची माहिती होताच कॉग्रेस कार्यकर्ते हे पोलीस स्टेशन परीसरात जमा झाले व काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते त्यामुळे पोलीस प्रशासन सज्ज झाले होते.

        पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून वातावरण शांत झाले.त्यानंतर पोलिस विभागाने सर्व सोपस्कार पूर्ण करून सिंदेवाही कोर्टात हजर केले असता न्यायालयाने नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांना जमानतीवर सुटका केली. 

         सदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी सिंदेवाहीचे ठाणेदार तुषार चव्हाण,सहा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सागर महल्ले सहा पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी हे पुढील तपास करीत आहेत.