युवासेनेच्या आंदोलनाचा धसका,सार्वजनिक बांधकाम विभाग लागले कामाला… — युवासेना उपजिल्हाप्रमुख यांच्या प्रयत्नाना यश..

 

युवराज डोंगरे/खल्लार

        उपसंपादक 

         सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गायवाडी फाटा ते कळाशी रोडचे काम सुरु आहे. त्या कामा मध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहीत्य वापरले जात आहे व ते निकृष्ट दर्जाचे साहीत्य वापरल्यामुळे रोड वरुन प्रवास करतांना निर्माण होणार्‍या धुळीमुळे आजु बाजुच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे व रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

           सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत रोडच्या कामाची निविदा देतांना अटी व शर्ती लावुन कंत्राट दिले आहे.पण सदर कंत्राटदार त्या अटी व शर्तीचे पायमल्ली करत आहे.

          त्यामुळे शेतकरी बांधवाना तसेच रोडनी प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्रास होऊन अपघात प्रमाण वाढत आहे.सदर रोडचे बांधकाम मनमानी सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फेत त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.

          त्यामुळे कर्मचारी व ठेकेदार यांचे साठलोट असल्याचे निर्देशनात येत आहे.

              सदर कामाची आपल्या स्तरावरुन चौकशी करावी व शेतकर्‍याच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई हेक्टरी दिड लक्ष रुपये द्यावी.ते निकृष्ट दर्जाचे काम बंद न झाल्यास व सदर ठेकेदारांवर योग्य कार्यवाही न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना मार्फेत येत्या 7 दिवसात जनआंदोलन उभारण्यात येईल,आणि या होणार्‍या जन आंदोलनास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील.अशा प्रकारचे निवेदन युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वात परिसरातील शेतकरी बांधवानी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.

            त्या निवेदनामध्ये आंदोलनाचा इशारा युवासेनेमार्फेत देण्यात आला होता.त्याची दखल सार्वजनिक विभागामार्फेत घेण्यात आली आहे.त्या संदर्भातील दि.१८ ऑक्टोबर रोजी पत्र काढुन सर्व मागण्या पुर्ण झाल्याचे परीपत्रकात नमुद आहे.त्यामुळे गायवाडी ते कळाशी येथील नागरीक युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या केलेल्या कार्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.