Home Maharashtra टेकाडी पैकू राऊत देव रोड वरील पूल गेलं पुराणे वाहून… —...

टेकाडी पैकू राऊत देव रोड वरील पूल गेलं पुराणे वाहून… — तात्काळ दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

         चिमूर दिनांक १९ जुलै २०२४ अतिवृष्टी मुळे पुराचे थैमान होऊन राऊत देव रोडवरील मुख्य दोन पुलापैकी,श्री राहुल हजारे, ढोणे यांचे शेत जवळील संपूर्ण पूल तुटून वाहून गेले.

           त्यामुळे सर्व वाहतूक आजही ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले असून शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन कराव लागत आहे.

          त्यामुळे सदर रस्ता संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने यांची तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्ती करून देण्याची मागणी टेकाडी शेत शिवारातील शेतकरी नानाभाऊ शिरभय्ये व शेतकऱ्यांनी केली आहे.