आजचा दिवस म्हणजे सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा प्रारंभीक दिवस होय… आणि आत्मविश्वासाने व आत्मश्वासाने,याचबरोबर आत्मसन्मानाने जगण्यासाठी स्वातंत्र्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मार्ग खुले करणारा दिवस होय.
प्रिय-बंधू भगिनींनो,पारतंत्र्याच्या काळात दुहेरी गुलामगिरीतून मार्गक्रमण करताना आपल्या बुजरुगांनी अमानुष हाल-अपेष्टा भोगल्यात,निच वृत्तीचे छलकपट अनुभवले,आणि जिवंतपणीच मरणयातना सहन केल्यात.
पण,या भारत भुमीवर अशा परिवर्तनशील युगप्रवर्तक क्राती सुर्याचा जन्म झाला.त्या महान युगप्रवर्तकांनी अतिशय वर्णभेद संकटाला व छळाला बाजूला सारत स्वतःला घडविले व यानंतर जातिभेदाच्या व धर्मभेदाच्या चौकटीला भेदत देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि उन्नतीसाठी जिकरीचा संघर्ष केलाय..
यातच त्यांची महा बौद्धिक क्षमता देशासह जगात मान्य झाली.
लोकहित व लोकसंरक्षण बघता विपरीत परिस्थितीत सुध्दा भारताचे संविधान लिहीण्याची संधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून घेतली होती.या बाबतचा इतिहासिक संघर्ष खूपच भयानक आहे.
भारतीय संविधान म्हणजे नक्की काय तर सरकार द्वारे या देशातील सर्व नागरिकांचे संरक्षण करण्याची हमी होय आणि प्रत्येक नागरिकांची सर्वंकष उन्नती करण्याची जबाबदारी होय.!
संविधानाने परत या देशातील नागरिकांना काय अधिकार दिले तर स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार,प्राथमिक शिक्षण शक्तीणे मोफत घेण्याचा अधिकार,चल अचल धनसंपदा संपादन करण्याचा अधिकार,देशात कुठेही राहण्याचा अधिकार,व्यापार करण्याचा अधिकार,विनामूल्य व कमी मूल्यातंर्गत उपचार करण्याचा अधिकार,समानतेने व समतेने राहण्याचा अधिकार,बंधुत्वाने जगण्याचा अधिकार,न्याय मागण्याचा अधिकार,बोलण्याचा व लिहिण्याचा अधिकार,मतमतांतरे माडण्याचा अधिकार,आमदार,खासदार,मंत्री,मुख्यमंत्री,प्रधानमंत्री,राज्यपाल, राष्ट्रपती व इतर सर्व प्रकारचे लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार,उपजिविकेसाठी अन्नधान्याचा संचय करण्याचा अधिकार,योग्य कपडे वापरण्याचा अधिकार,आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार,धर्म परिवर्तन करण्याचा अधिकार,समाजसेवा करण्याचा अधिकार,अधिकारी व कर्मचारी बनण्याचा अधिकार,सरकारी- निमसरकारी-खाजगी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्याचा अधिकार,सर्वांना अन्याय-अत्याचारा विरोधात संघर्ष करण्याचा अधिकार, स्वतःच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी घरे बांधण्याचा अधिकार,या देशातील सर्व नागरिकांना मताधिकार (मते देण्याचा अधिकार),एवढेच काय तर देशातील सत्ताधारी देशातीलच नागरिकांचे रक्षण करण्यासाठी स्वतःला कमजोर समजून घेत असतील किंवा जाणिवपूर्वक ते देशातील नागरिकांचे रक्षण करीत नसतील तर देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी,संघर्ष करण्याचा नागरिकांना दिलेला विशेष अधिकार म्हणजे स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे जतन करण्याचा सर्वोच्च अधिकार होय हे आपण जाणून घेतले पाहिजे.
तद्वतच भारतीय संविधानाची महानता ही आहे की जे लोक संविधानाचा द्वेष करतात त्यांचेही संविधान संरक्षण करतय,जे भारतीय संविधानाला बदलू इच्छितात त्यांचेही संविधान रक्षण करतय,जे संविधानाच्या विरोधात बोलतात त्यांनाही बोलण्याची संधी देतय…
देशातील सर्व नागरिकांचे समान पध्दतीने संरक्षण करणारे एवढे महान संविधान जागाच्या पाठीवर कुठेही नाही,म्हणून वर्तमानकाळात आपण संविधानाला समजून घेतले पाहिजे आणि संविधानाचा विरोध करणेवाल्यांनाही संविधान समजवून दिले पाहिजे,हे कार्य फार महत्त्वाचे व अनन्यसाधारण आहे असे मला वाटतय..
“संविधान दिनानिमित्त…
सर्वांप्रती मनःपूर्वक विनम्रपणे आभार व्यक्त करतो आहे,आणि उज्वल भविष्यासाठी सर्वांना सस्नेह हार्दिक शुभेच्छा देतो आहे…..
*****
मनोगत


