“राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तत्ववेत्ते आणि महापुरुषांच्या क्रांतीला आम्ही ( बुद्धीजीवी वर्ग ) त्याग, संघर्ष आणि समर्पणातून ( आचरणातून ) समजून घेण्यास कमी पडतो. म्हणून क्रांतिकारकांचा सत्य इतिहास आम्ही केवळ जाणतो.परंतू , त्यासाठी आम्ही काहीही न करता स्वतःच्या मानसिक परिघाच्या आतच घुटमळून संपून जातो. झालंच तर त्या महापुरुषांचा हेवा वाटून,त्यांच्यापेक्षा मी सुद्धा काही कमी नाही असं स्वतःला वाटून घेऊन काहीतरी त्यांच्याबरोबर तुलना करू इच्छितो आणि सूर्यावर थुंकलेली थुंकी स्वतःच्याच तोंडावर पाडून घेतो.
अशी आमची आजची विद्वान मंडळी निपजत आहे!
आज आपण पाहतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जसजशी जवळ येती ( महिन्याभरापासून अगोदरच ) तसतसा जयंतीचा ज्वार हळूहळू वाढत जातो.
आतापासूनच जयंतीचे बॅनर लावायला सूरूवात झालेली आहे. या बॅनरवरील महामानवाचे फोटो अतिशयोक्ती करुन विदृपीकरणाकडे जातांना दिसत आहेत.पूर्वी बाबासाहेबांपेक्षा नेत्यांचे, गल्लीतल्या कार्यकर्त्यांचे फोटो मोठे दिसायचे.ते आजही चालूच आहेत.परंतू ,आता एका नवीनच विदृपीकरणाचे फॅड आलेले आहे.
बाबासाहेबांच्या चेहऱ्याची ठेवण विद्वतेला न शोभणारी,सोफ्यावर बसलेला फोटो,दातातून दिसणारे विडंबन,केसांची विचित्र रचना,चेहऱ्यावरील हावभाव हे निराशात्मक वाटणारे,हतबलता जाणवणारे असे कितीतरी वेगवेगळ्या पोजमध्ये विकृत फोटो आम्ही त्या बॅनरवर का टाकावी? “
आम्हाला कुणी अधिकार दिला असे विकृत फोटो टाकण्याचा.?
का RSS / मनुवाद्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना पॆसे दिले.हे विद्रुपीकरण आणि विकृतिकरण करुन सत्य इतिहास दडपवण्यासाठी…….
अरे त्या बॅनरवर केवळ आणि केवळ……
भगवान बुद्ध,संत कबीर,म.फुले,संविधान,वरच्या बाजूला फोटो येऊद्या.
आणि खाली मोठ्या आकारात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असा टाकावा….
गोलमेज परिषदेत भाषण करतानाचा असला पाहिजे…
संविधान लिहिताना असला पाहिजे…
येवला येथील धर्मांतराची घोषणा करतानाचा असला पाहिजे….
ब्रिटिश म्युझियम मध्ये अभ्यास करतानाचा असला पाहिजे….
नागपूरच्या दिक्षाभूमीवर धम्मदिक्षा घेतांना / देतानाचा पाहिजे……
महाड आणि काळाराम मंदिर सत्याग्रहाचे फोटो पाहिजे…
केळूसकर गुरुजींनी बुद्धचरित्र पुस्तक भेट देतानाचा फोटो पाहिजे….
राजगृहातील रमाई आणि महामानवाचा वास्तव्यातला दुर्मिळ अभ्यास करतानाचा किंवा लिहितानाचा फोटो पाहिजे….
परदेशातून पदव्या घेतानाचा फोटो पाहिजे…..
इत्यादी कितीतरी वास्तव फोटो बॅनरवर आले पाहिजे. शिवाय त्यांचे आपल्यासाठी असलेले अतिमहत्वाचे संदेश त्यावर असलेच पाहिजेत.
शिवाय त्या बॅनरवर एकाही कार्यकर्त्याचा किंवा दुसऱ्या कोणत्याही नेत्याचा फोटो अजिबात दिसलाच नाही पाहिजे!
केवळ बॅनरच्या खाली शेवटी एक लाईन मारून स्थानिक कार्यकर्त्यांची मोजकीच नावे टाकावीत.आणि नावे टाकण्यावरून जर वाद होत असतील तर समस्त गावकरी, किंवा समस्त कॉलनी,नगर,वाडी नागरिकांच्या वतीने जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…
असेच बॅनर असले पाहिजेत….
त्याशिवाय डी.जे.लावून मिरवणूक तर काढूच नये. उलट त्या दिवशी महापुरुषांचे विचार आजच्या काळाला कसे लागू पडतील.याचे चिंतन,मनन आणि अंतर्मुख होऊन कसे जागृत होऊन कृतीतून कसे सिद्ध होऊ.याविषयीचे विचारविनिमय झालेच पाहिजे…..
कोणाकडूनही जबरदस्ती वर्गणी घेऊ नये.राजकीय नेते आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्याकडून तर निधी घेऊच नये.उलट जनतेच्या श्रमातून जमलेल्या निधीतूनच खर्च भागवावा…..
कोणत्याही राजकीय नेत्यांना भाषणासाठी तर अजिबात बोलावू नये…..
जे पंचशिलाचे पालन करुन चारित्र्याने जगण्याचा प्रयत्न करतात.अशांचा सन्मान आणि सत्कार आणि सन्मान करा.
विद्यार्थ्यांना अभ्यासातून शिलवान होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान पुस्तके देऊन करा….
अशा पद्धतीने जर आम्ही जयंती साजरी करू लागलो.तर इतरही समाज आपले अनुकरण करुन खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या क्रांतीला न्याय मिळू शकेल…..
अन्यथा,आम्हीच आमच्या महापुरुषांच्या क्रांतीचे मारेकरी ठरू…
हेच तर RSS मनुवाद्याना अपेक्षित आहे!!”
संविधान संपविण्यासाठी…..
जागृतीचा कृतिशील लेखक आणि आवाहनकर्ता..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद 7875452689…



