भरधाव अज्ञात वाहनाने,अज्ञात इसमास चिरडले……

प्रितम जनबंधु

    संपादक 

आरमोरी :- दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे 3.45 ते 4.00 वाजताच्या दरम्यान एका अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपने चालवुन आरमोरी शहरातील ताडुरवार चौकातील पंचायत समीती समोर एका अनोळखी पुरुष जातीच्या इसमास जोरदार धडक देवुन त्याचे शरीरावर आपले ताब्यातील वाहन चढवुन अनोळखी इसमाच्या डोक्याचा व डाव्या हाताचा जबर दुखापत करुन अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन घेवुन घटनास्थळावरुन पसार झाला असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

          सदर अपघाताची माहीती मिळताच आरमोरी पोलीस चमु घटनास्थळी दाखल होऊन सदर अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करीत असुन पोलीस स्टेशन आरमोरी यथील गु. रजि. क्र. 395/2023 कलम 279, 304 (अ) भा.द.वी. सहकलम 184, 134 मोवाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास आरमोरीचे पो.नि. संदिप मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा विशाल केदार हे करीत आहेत गुन्ह्यातील अज्ञात वाहन चालकाचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु आहे.

             तसेच सदर प्रकरणातील अनोळखी मृतकाची अद्याप ओळख पटलेली नसुन चेहरा ओळख पटन्याच्या स्थितीत नसल्याने शवविच्छेदनानंतर त्याचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथील फ्रिजरमध्ये सुरक्षीत ठेवलेला आहे. 

           सदर मृतदेहाचे वर्णन अंदाजे वय 50 ते 55 वर्ष, उंची 05 फुट, रंग- सावळा, पोषाकाचे वर्णन काळ्या रंगाचा नाईट पँट, निळ्या रंगाची हॉप टि-शर्ट, काळ्या रंगाचा जॉकेट अशा प्रकारे अनोळखी मृतकाचे वर्णन व पोषाक असुन सदर वर्णानाचा व पोषाकाचा इसमाबाबत कुठलीही माहीती मिळुन आल्यास पोलीस स्टेशन आरमोरी येथील टेलीफोन क्र. 07137295538, मो.क्र. 7588108971 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.