शासकीय योजनेपासून कोणीही वंचित राहता कामा नये…..  — अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा यांचे निर्देश…. — आरमोरी तालुक्याचा घेतला आढावा….

प्रितम जनबंधु

   संपादक

आरमोरी :-

    नागरिकांना शासकीय कार्यालयात अडथळा येता कामा नये. कोणतेही नागरिक शासकीय योजनेपासून वंचित राहू नये. पुराचा फटका बसलेल्या गावांचे व शेतकऱ्यांच्या शेतांचे तात्काळ सर्वे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करा. असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

         ते आरमोरी तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा सभेत बोलत होते.  

          यावेळी आमदार कृष्णा गजबे, माजी कृषी सभापती नाना नाकाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, उपविभागीय अधिकारी लोंढे, तहसीलदार श्रीहरी माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमीन लालानी, रा. का. तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवाणी, भा.ज.पा. तालुका अध्यक्ष नंदू पेट्टेवार, नगर परिषद सभापती विलास पारधी, पंकज खरवडे, नायब तहसीलदार लाडे, व विविध शासकीय विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.