Home Maharashtra दर्यापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या… — प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा...

दर्यापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या… — प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करीत नातेवाईकांंची पोलीस स्टेशनवर धडक…

युवराज डोंगरे/खल्लार 

            उपसंपादक

             दर्यापूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.

            दरम्यान शनिवारी कुटुंबीयांनी दर्यापुर पोलीस ठाण्यावर धडक देऊन प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

                निलेश प्रकाश गुजर (वय.२७) रा.मोर्शी असे मुतकाचे नाव आहे. निलेश आपल्या मावशीच्या घरी दर्यापूरात मागील कित्येक वर्षांपासून वास्तव्यास होता. शिक्षण घेत स्पर्धा परिक्षा देत होता.

             शुक्रवारी घरातील सर्व सदस्य हे शेगाव येथे गेल्यानंतर निलेशने आपली जीवनयात्रा संपवली. मुतक निलेशची प्रेयसी त्याला वारंवार पैशांची मागणी करत होती व मानसिक त्रास देत होती. निलेशला आत्महत्या करण्यास त्याच्या प्रेयसीने प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप निलेशच्या नातेवाईकांनी माध्यंमाशी बोलतांना केला आहे.

          शनिवारी मुतक निलेशच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन प्रेयसीवर व तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा यासाठी दोन तास ठिय्या दिला.

          यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र ठाणेदारांशी चर्चेअंती प्रकरण निवळले. शवविच्छेदनावेळी उपजिल्हा रुग्णालय दर्यापुर येथे नातेवाईकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मुतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.गळफास घेतलेल्या युवकाच्या मृत्यूप्रकरणी दर्यापुर पोलीसांनी मर्गं दाखल केला आहे.