नवनियुक्त कांद्री स्थायी मुख्याधिकारी सचिन गाढवे यांचा केला सत्कार…

कमलसिंह यादव 

प्रतिनिधी

कन्हान : – नव्याने झालेल्या नगरपचायत कांद्री येथे पहिल्यांदा नवनियुक्त स्थायी मुख्याधिकारी मा. सचिन गाढवे यांनी पदभार स्विकारल्याने ग्रा प कांद्रीचे माजी सरपंच श्री बळवंत पडोळे सह शिष्टमंडळाने कार्यालया त भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छाने सत्कार करून नगरा तील विविध विषयावर चर्चा करून समस्याकडे त्यांचे ध्यानाकर्षण केले. 

        ग्राम पंचायत कांद्री चे २६ डिसेंबर २०२२ ला रूपातंर नगरपंचायत मध्ये होऊन आठ महिने होऊन आता पर्यंत प्रभारी मुख्याधिकारी म्हणुन पारशिवनी तहसिलदार कार्यभार सांभाळत होते. बुधवार (दि.२३) ऑगस्ट ला नगरपचायत कांद्री येथे पहिल्यांदा नवनियु क्त स्थायी मुख्याधिकारी सचिन गाढवे यांनी पद भार स्विकारल्याने ग्रा प कांद्रीचे माजी सरपंच श्री बळवंत पडोळे सह शिष्टमंडळाने शुक्रवार (दि.२५) ला कांद्री नगरपंचायत कांद्री कार्यालयात मुख्याधिकारी सचिन गाढवे यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छाने सत्कार करून नगरातील विविध विषयावर चर्चा करित वेकोली कोळसा खाणीचा ब्लास्टिंगमुळे मोठ्या प्रमाणात हादरे बसुन गावातील घरांना तडे जात आहे.

        तसेच कृत्रिम टेकड्यांमुळे होणाऱ्या कोळसा धुळीच्या प्रदुषणा बाबद, सोबतच गावात डेंग्युचे रुग्ण वाढत असल्याने फवारणी व फॉगिंग करणे, थकीत दिव्यांग ५% निधी दिव्यांग बांधवांवर खर्च करणे, कचरा गाडी व विद्युत दिव्या विषयी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी असल्याने त्या तात्काळ सोडविण्या संदर्भात अवगत करून आदी समस्याकडे त्यांचे ध्यानाकर्षण केले. शिष्टमंडाळात माजी ग्रा प सद्सय चंद्रशेखर बावनकुळे, बैसाखु जनबंधु, महेश झोडावणे, राहुल टेकाम, नागरिक गणेश सरोदे, केशवराव मस्के, रविद्र सावरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.