Home देशविदेश शेवटी हरियाणा पॅटर्न 100% मोदी – शहाने महाराष्ट्रात यशस्वी केलाच….

शेवटी हरियाणा पॅटर्न 100% मोदी – शहाने महाराष्ट्रात यशस्वी केलाच….

         एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ” त्या ” काळात आपल्या विद्वत्तेच्याआणि शिलाच्या बळावर कुटनीतीला जगाच्या वेशिवर या देशात टांगून मनुवाद्याना सळो की पळो करुन सोडले होते….

       पण आज आम्ही त्यांची स्मारकावर स्मारके बांधणारी,पुतळ्यावर पुतळे बांधणारी त्यांची औलाद ( वैचारिक वारसा सांगणारे विद्वान ) बाबासाहेबांच्या विद्वत्तेच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकलो नाही…

    हे सिद्ध झाले!

         मोदी -शहाच्या प्रती क्रांतीच्या लाटेत आज संपूर्ण देश,संविधान,लोकशाही वाहून गेले…

           आम्ही ( आंबेडकरवादी, संविधानवादी जनता ) मात्र षंढ आणि नेभळट होऊन म.गझनीने 1030 मध्ये सोमनाथाचं मंदिर लुटताना जसे मंदिरातील पुजारी एकामागून एक स्त्रियांसहित हतबल होऊन अग्नित उड्या घेऊन बळी जात होते.त्या इतिहासाची आठवण कालच्या EVM च्या निकालाच्या प्रतापाने संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली!..

           इथे प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाच्या हार जीतचा किंवा जमीन अस्मान फरकाचा अजिबात नाही.इथे प्रश्न हा आहे की,संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीच्या काळात वाहिलेल्या नोटांच्या बंडलांच्या महापुराचा आहे.

         इथे प्रश्न नागपुरात सापडलेल्या अनधिकृत EVM भरलेल्या गाडीचा आहे…..

           इथे प्रश्न नालासोपारा येथील विवांता हॉटेल मधील विनोद तावडेच्या पॆसे वाटप करतानाच्या पकडलेल्या पुराव्याचा आहे…..

          एवढे होऊन जर निवडणूक आयोग गप्प बसत असेल सर्वच निवडणुका या प्रकरणामुळे रद्द करत नसेल तर आम्ही ( भारतीय जनता ) या व्यवस्थेचे गुलाम आहोत का?

        आज जर आदरणीय टी.एन.शेषन साहेब असते तर……

          संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाच रद्द केल्या असत्या.विनोद तावडेला जेल मध्ये टाकून भाजपाची पक्षमान्यताच रद्द केली असती.त्या वेळी ना राष्ट्रपती,ना सर्वोच्च न्यायालय हतबल हात चोळीत बसले असते.एवढी शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून याच मुख्य निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य आणि अधिकार बहाल केलेले आहे..

         आणि आज याच मुख्य निवडणूक आयोगाने संविधानदिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या 75 वर्षे पूर्ण होण्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही आणि संविधानाला जगाच्या वेशीवर टांगण्याचे काम केले आहे.

            या निवडणूक आयोगाबरोबरच सर्वोच्चं न्यायालय,राष्ट्रपती,प्रधानमंत्री,महानियंत्रक,प्रशासकीय अधिकारी तेवढेच जबाबदारीने बरोबरीत भागीदार आहेत.

             तेंव्हा आता मात्र माझ्यासारखे बोटावर मोजण्याइतके जे कोणी खरे संविधानवादी,मानवतावादी,मनुस्मृतीविरोधी,जे खरोखर या देशाचे नागरिक आहेत,ते शिकलेले नसले तरी चालतील,केवळ समाज माध्यमातील शब्दांच्या झुली पांघरून शब्दातून क्रांती होण्याची केविलवाणी वाट पाहणारे स्वार्थी अंधभक्त आता नकोत..

          अशा बोटावर मोजण्याइतक्या जनतेला सोबत घेऊन सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करुन,तन,मन आणि धनाने समर्पित होऊन मनुवाद्यावर सर्व बाजूनी हवी होण्यासाठी लढावे लागेल.

      आता संविधान दिन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,महापरीनिर्वाणदिन,14 आक्टोबर,हे उत्सव आमच्या बेंबीच्या देठापासून बोंबलण्यासाठी साजरे नाही केले तरी चालतील.लाखो रुपये पेन्शन घेणाऱ्या प्राध्यापकांना हजारो रुपये देऊन व्याख्यानाला नाही बोलावले तरी चालेल,मनोरंजनासाठी गायकांना लाखो रुपये देऊन 4 तासात कोणती क्रांती झाली असे इतिहासाने सिद्ध केले नाही. ( त्याला वामनदादा अपवाद आहेत.कारण वामनदादा नोटा सहकाऱ्याना द्यायचे आणि खुर्दा फक्त घायचे …..!)

       म्हणून आता केवळ आणि केवळ या मनुवाद्याच्या विरोधात,मनुस्मृतीच्या विरोधात संविधान जागृती बरोबरच EVM हटविण्याच्या भारतीय क्रांतीला रस्त्यावर उतरून या व्यवस्थेच्या विरोधात मला सुरुवात करायची आणि तेही आज,आता,ताबडतोब,या क्षणापासून…

तुम्ही?

             आव्हानकर्ता 

             अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..