Home देशविदेश आर.आर.एस.च्या विरोधात फक्त आंबेडकरवादी लढू शकतात.:- सुजात आंबेडकर… — आर.एस.एस.संघटना प्रमुखांसह...

आर.आर.एस.च्या विरोधात फक्त आंबेडकरवादी लढू शकतात.:- सुजात आंबेडकर… — आर.एस.एस.संघटना प्रमुखांसह त्यांच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी… — प्रचंड मोर्चा,पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि महाराष्ट्र पोलिसांना गंभीर प्रश्न….

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

        आर.एस.एस.संघटना रजिस्टर नसल्याने,त्या संघटनेवर व संघटना प्रमुखासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत,फक्त आंबेडकरवादीच अनधिकृत असलेल्या आर.एस.एस.संघटनेच्या विरोधात लढू शकतात व आर.एस.एस.कार्यालयावर मोर्चा काढू शकतात असे प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन करताना औरंगाबाद येथे आज दिनांक २४ आक्टोंबर २०२५ रोज शुक्रवारला केले…

                औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेट पुढे १० आक्टोंबर २०२५ ला आर.एस.एस.पदाधिकाऱ्यांनी विना परवानगी सदस्य नोंदणी करणे सुरू केली होती.

      याबाबत वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद शहर अध्यक्ष राहुल मकासरे व विजय वाहुळ यांनी हरकत घेतल्यांने त्यांच्यावरच औरंगाबाद पोलिसांनी बेजबाबदारपणे व गैर मानसिकता अंतर्गत गंभीर कलमातंर्गत दखलपात्र गुन्हे दाखल केले.              पोलिसांच्या अशा बेकायदेशीर,बेजबाबदार,गैर मानसिकतेचा विरोध करण्यासाठी व आर.एस.एस.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) च्या क्रांती चौकातून विशाल मोर्चा आंबेडकर वाद्यांद्वारे काढला गेला.

          आर.एस.एस.मुर्दाबाद च्या गगनभेदी नाऱ्यातंर्गत मोर्चेकरांच्या अफाट शक्तीचा व प्रचंड एकसंघतेचा निनाद महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री,मंत्री,गैर मार्गाने वागणारे महाराष्ट्र राज्यातील पोलिस अधिकारी आणि भारताचे प्रधानमंत्री व मंत्री,आर.एस.एस.संघटना प्रमुख मोहन भागवत यांच्या कानापर्यंत पोहोचवीला..

         वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विशाल मोर्चा अतिशय शिस्तबद्ध व शांतमय होता.या मोर्चात अनेक विद्वान,इतिहासिक जाणकार यांचा सुध्दा सहभाग होता.

          सुजात आंबेडकर यांनी अनधिकृत असलेल्या आर.एस.एस.संघटनेच्या व या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत महाराष्ट्र पोलीसांना चार प्रकारचे प्रश्न विचारले व सदर विषय गंभीर असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.

               याचबरोबर आर.एस.एस.संघटना अनधिकृत असल्याने ती भारत देशात बेकायदेशीर कार्य व काम कसे काय करतय? बेकायदा संघटनेसाठी फंडीग गोळा कशी काय करताहेत? फंडीग जमा संबंधाने आर.एस.एस.संघटनेच्या संचालक मंडळांकडे दप्तर नोंदी आहेत काय? ही संघटना शस्त्र पुजन विना परवानगीने कशी करतय? व यांच्याकडे शस्त्र परवाना आहे काय? असा प्रश्न सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्र पोलीसांना केला आहे..

             वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेतृत्व असलेले सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्र पोलीसांना विचारलेल्या चार प्रश्नातंर्गत ते कोणती भूमिका घेतात आणि आर.एस.एस.संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर फौजदारी कारवाई करणार काय? हे प्रश्न पुढील काळात भाजपा,आर.एस.एस.व महाराष्ट्र पोलीसांसाठी कायदेशीर अळचणीचे ठरु शकतात एवढे निश्चित!