आ.प्रितंम सर सस्नेह हृदयस्पर्शी शुभेच्छा… — आज तुमचा वाढदिवस…   — तुमचा वाढदिवस मला सदभावना व्यक्त करण्याची संधी देतो आहे….

 

       आपण समजदार, अनुभवी, जागरुक, सतर्क, संवेदनशील व शांतप्रिय व्यक्तीमत्व आहात,हे निखळ सत्य आहे…

             तद्वतच तुमच्यात बौध्दीक क्षमता आहे हे सुध्दा तुमचे उत्तम वैभव आहे..

                “दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे,संपादक या हक्काने,”जनहितार्थ बातम्या व अग्रलेख,आपण आपल्या स्तरावरुन प्रकाशित करण्यासाठी पाठविताय व तुमच्या सर्व बातम्या आणि सर्व अग्रलेख,” दखल न्यूज भारत,”बेधडक,प्रकाशित करतो आहे..

            “दखल न्यूज भारत,एक वैभवशाली तथा कणखर वैचारिक विशाल ज्ञानपीठ आहे.तद्वतच न झुकणारे व न वाकणारे स्वाभिमानी,अस्मितादर्शक असे उत्तुंग विचार पिठ आहे.” आ‌.प्रितंम सर आपण न डगमगणाऱ्या अशा चालत्याबोलत्या विचार प्रचारक पिठाचे सहकारी आहात हे तुमचे उत्कृष्ठ कर्तव्य समजावे लागेल.

             मनातंर्गत वैचारिक विकसितपणा व मनातंर्गत खुला सदभाव हा मानसाला नेहमी यशस्वी करीत असतो,मोठा बनवित असतो हे सुध्दा तितकेच खरे आहे.आपणास मनाचा उतुंग विकसितपणा लाभलेला आहे असे मी मानतो आहे.

              झाडाची वाढ होण्यासाठी आणि त्या झाडाला मोठे करण्यासाठी उत्तम जमीनीची व वातावरणाची गरज असते.याच प्रमाणे मनुष्यमात्रांना मार्ग दाखविण्यासाठी व मोठे होण्यासाठी आईवडीलांचा सदैव आशीर्वाद असणे आवश्यक आहे‌.तद्वतच उत्तम मित्रांचा सहवास लाभने तितकेच गरजेचे आहे.

           मला वाटतय आपणास आईवडिलांचा हृदयस्पर्शी आशीर्वाद मिळालेला आहे आणि उत्तम मित्रांचा सहवास सुध्दा लाभलेला आहे.

            आ.प्रितम सर,तरणारे व तारणारे व्यक्तीमत्व म्हणून आपण पुढे यावे अशी माझी मंगलमय कामना तुमच्या प्रती आहे..

            “आपण,खूप मोठे व्हावे व निरंतर यशस्वी ठरावे,असी माझी मनस्वी सदिच्छा सुध्दा तुमच्या प्रती आहे..

***

              तुम्हाला…

   वाढदिवसाच्या निमित्ताने…

              तुमच्या उज्वल भविष्यासाठी व उदंड आयुष्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आहे…

           तद्वतच आपण सदैव सुखी,समाधानी,आनंदी,निरोगी रहावे असी सदिच्छा व्यक्त करतो आहे…

****

           आपला स्नेही

               प्रदीप रामटेके 

                   मुख्य संपादक 

***

दिनांक: – २४ आक्टोंबर २०२३,रोज मंगळवार…