Home Maharashtra भद्रावती नगरपरिषदे अंतर्गत इमला अतिक्रमण धारकांना मालकी हक्क पट्टे देण्यात यावे,या संबंधाने...

भद्रावती नगरपरिषदे अंतर्गत इमला अतिक्रमण धारकांना मालकी हक्क पट्टे देण्यात यावे,या संबंधाने भाजपा शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी… — महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे,आमदार किरण देवतळे,चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन सादर..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी..‌

      भद्रावती नगरपरिषदे अंतर्गत येत असलेल्या सुमठाणा,डोलारा,गवराळा,विंजासन,पांडव वार्ड,हनुमान नगर,नेताजी वार्ड,शिवाजी नगर येथील 7 /12 वरील नोंद कमी करून ती जमीन महसूल विभागाकडे वळती करावी व अतिक्रमण धारकांना मालकीहक्क पट्टे देण्यात यावे अशी मागणी भाजपा शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी तहसीलदार भद्रावती यांच्या कडे केली आहे.

       देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व बेघर असणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळावी म्हणून संपूर्ण देशात घरकुल योजना राबविली.परंतु अनेक नागरिकांना या योजने पासून वंचित राहावे लागल्याने ज्यांचे जवळ स्वतःची जमीन नाही,परंतु शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्र शासनाने पट्टे देण्याचा महत्वाकांशी निर्णय घेतला.

      परंतु भद्रावती शहरातील सुमठाणा,डोलारा,गवराळा,विंजासन,पांडव वार्ड,हनुमान नगर,नेताजी वार्ड,शिवाजी नगर येथील अतिक्रमित जमीन हि सरकारची असली तरी 7/12 वर झूडपी जंगल,गायरान,चराईची नोंद असल्याने शासकीय यंत्रणेला अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यास अडचण निर्माण झाली आहे.

          म्हणूनच भद्रावती शहरातील सुमठाणा,डोलारा,गवराळा,विंजासन,पांडव वार्ड,हनुमान नगर,नेताजी वार्ड,शिवाजी नगर येथील 7/12 महसूली रेकार्ड वर असलेली झूडपी जंगल,गायरान,चराई,नोंद कमी करून ती जमीन महसूल विभागाकडे वळती करावी व अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.करण देवतळे यांचे माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आले.

         निवेदन देतेवेळी भाजपचे असीम बिस्वास,समीर गोलदार, गौतम सरकार, मंगेश देवगडे,रॉय व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.