हुतात्मा राजगुरू जयंती निमित्ताने आळंदीत रॅली व एकपात्री नाटक….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : स्वातंत्र्य संग्रामातील एक तेजस्वी तारा असलेले हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची ११४ वी जयंती साजरी होत आहे. हुतात्मा राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ मध्ये राजगुरुनगर येथे भीमानदी काठी भव्य तटबंदीवजा भिंत असलेल्या वाड्यात झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त आळंदीत हुतात्मा राजगुरू मजदुर संघाच्या वतीने हुतात्मा राजगुरू जयंती साजरी करण्यात आल. यावेळी आळंदीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

       यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, आळंदीकर ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित. तसेच खेड तालुक्यातील प्रा.रविंद्र चौधरी यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटक सादर करण्यात आले. 

        यावेळी माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, सागर भोसले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सुलतान शेख, उद्योजक राहुल चव्हाण, अरुण घुंडरे, डॉ.सुनील वाघमारे, निसारभाई सय्यद, सौरभ गव्हाणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, अनिल जोगदंड, मल्हार काळे, अविनाश राळे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे उपस्थित होते.