Home Maharashtra डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सुदाम राठोड सन्मानित…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सुदाम राठोड सन्मानित…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

           एकता फॉउंडेशन सामाजिक संघटनेतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पेदाआसापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांना बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2026 देण्यात आला.

           राठोड हे सदैव समाजात गोरगरिबांच्या हक्कासाठी लढा देत असतात तसेच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ते सतत लढत असतात.सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून शासन व प्रशासनाशी आंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.या शिवाय गरीब रुग्णांना रक्ताचा तुटवडा कमी पडू नये म्हणून ते प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीर घेत असतात.

          वेगवेगळ्या माध्यमातून जनतेची ते सेवा करत असतात उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना एकता फॉउंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.