आता इडिची नजर जगप्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांच्याकडे…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

       वृत्त संपादीका 

          रोखठोक भूमिका मांडणारे व वास्तविक विचार पुढे आणणारे जगप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्याकडे इडिचे लक्ष गेले आहे.अमलबजावनी संचालनालयाने एका मनी लाॅन्ड्रिग प्रकरणाला अनुसरून प्रकाश राज यांना नोटीस बजावली आहे.

            पाॅन्झी योजनेशी संबंधित कथित मनी लाॅन्ड्रिग प्रकरणात प्रशिध्द अभिनेते प्रकाश राज यांना अळचणीत आणण्यास इडी सक्रीय झाली असल्याचे दिसून येते.

          या आधी ईडीने तामिळनाडूतील त्रिची येथील प्रवण ज्वेलर्सच्या ठिकाणी छापा टाकला होता.या प्रकरणी अभिनेते प्रकाश राज यांची चौकशी ईडी करणार आहे.प्रकाश राज हे प्रवण ज्वेलर्ससाठी जाहिरात करतात.

           यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर रोखठोक शब्दात अप्रत्यक्ष प्रकाश राज यांनी हल्ला चढवला होता.यामुळे कदाचित ईडीची करडी नजर त्यांच्याकडे फिरली असेल असा अंदाज देशातील नागरिक लावत आहेत.