Home Maharashtra आंबोली ग्रामपंचायतला मिळालाय जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार…

आंबोली ग्रामपंचायतला मिळालाय जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी 

  चिमूर :- चिमूर तालुकांर्गत मौजा आंबोली ग्रामपंचायतला यावर्षीचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत स्वर्गीय आबासाहेब खेडेकर विशेष जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झालेला आहे.

     सन २०२४-२५ या वर्षा अंतर्गत जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान चमूने गावाचा संपूर्ण सर्वेक्षण केले होते.

      त्या सर्वेक्षणानुसार जिल्हातून विशेष पुरस्काराने आंबोली गावाला सन्मानित केलेलले आहे.

       स्वच्छता सर्वेक्षण चमूने पाणी,गुणवत्ता व व्यवस्थापन,शौचालय व्यवस्थापन घनकचरा,सांडपाणी व्यवस्थापन,,गांव स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता,लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रमाची कटाक्षाने पाहणी केली होती.

         यानंतर चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा आंबोली गावाला गुणक्रमांकानुसार,जगविख्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत स्वर्गिय आप्पासाहेब खेडेकर पुरस्कार जाहीर केला आहे.