सासु सुनेच्या वादावरुन विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या… — दर्यापूरच्या खाटीक पुरा येथील घटना…

 

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक

        सासू सुनेच्या वादातून विवाहीतेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दर्यापूर येथील खाटीक पुरा येथे घडली.

         दर्यापूर येथील खाटीक पूरा,खोलापुरी गेट येथील रहिवासी असणाऱ्या व दर्यापूर तालुक्यात पत्रकार क्षेत्रात कार्यरत असणारे दैनिक विदर्भ केसरीचे संपादक अमोल नरेश कंटाळे यांच्या पत्नी सौ दिप्ती अमोल कंटाळे(वय २५) व सासू यांच्यामध्ये दिनांक २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या कौटुंबिक वादात सुनेने राहत्या घरात गळफास लावून आपले जिवन संपविले.सासू सुनेच्या कौटुंबिक वादात सुनेचा जिव गेला असल्याची दुःखद घटना दर्यापूर येथे घडली आहे.

या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

       दर्यापूर पोलिसांनी पंचनामा करून अमोल कंटाळे व त्याची आई या दोघांवर भादवी 306,498,34 अंतर्गत गुन्हे दाखल करत पती अमोल कंटाळे यांना उशिरा रात्री अटक करण्यात आली व आईला अटक करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली असल्याने, आम्ही तिच्या पार्थिवाला हात लावणार नाही पहिल्यांदा अटक करा,नंतरच आम्ही अंत्यविधी अमरावती येथे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        त्यामुळे त्याच्या आईला दुपारी दोन वाजता अटक करण्यात आली व त्यानंतर त्यांचा पार्थिव हा अंत्यविधी करता अमरावती येथे देण्यात आला,अधिक तपास पीएसआय स्वर्गी मॅडम व त्यांचे सहकारी पो का भुजाडे करत आहेत.