नवजीवन (सीबीएसई) मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न..

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

        साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम शालेय प्रांगणात घेण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष प्राचार्य मा. मुज्जमिल सय्यद, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासन अधिकारी विनोद किरपान तसेच योगप्रशिक्षक वंसत लांजेवार उपस्थित होते.

       दरवर्षी २१ जूनला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधून योग दिनाचा कार्यक्रम शाळेत पार पाडला गेला. या प्रसंगी प्राचार्य मा. मुज्जमिल सय्यद यांनी सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत व प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य हवा असल्यास योगा सर्वोत्तम उपाय आहे असे आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले. तसेच योगप्रशिक्षक वंसत लांजेवार यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, उर्जा शक्ती वाढविण्यासाठी, ताणतणावा पासून मुक्ती करण्यासाठी, अंर्तयामी शांततेसाठी, अंतर्ज्ञान वाढविण्यासाठी योग करण्याचे उद्देश व फायदे शाळेतील समस्त शिक्षकांना समजावून सांगूण कृतीतून करून दाखविले.

       या प्रसंगी सतिश गोटेफोडे, जयंत खोब्रागडे, अजय बाळबुद्धे, किशोर बावनकुळे, विन्नुष नेवारे, श्रीधर खराबे, अशोक मीना, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रशात वालदे, सरताज साखरे, रोझी पठान, सुनिता बडोले, वैशाली भगतकर, विद्या जांभुले, दिपा येले, पुण्यप्रभा उपासे, रुनाली पंधरे, प्रियंका निंबेकर, प्रतिमा डोंगरे, स्वेजल टेंभुर्णे, माधुरी हलमारे, ज्योती डोंगरवार, लिलेश्वरी पारधी, वैशाली राउत, रेखा हातझाडे, प्रांजली गजभिये, स्मिता मस्के, माधवी बन्सोड, अनिता धुर्वे इतर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.