राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर अंतर्गत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी होणार साखळी लक्षणिक उपोषण व आमरण उपोषण…  — ठेवीदार व खातेदार होणार सहभागी.. — समाजसेवक किशोर अंबादे असणार आयोजक… — आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी थांबविण्यासाठी राजकीय शक्तींचा वापर होत असल्याचा खातेदार व ठेवीदारांचा संशय..

 

  दखल न्यूज भारत

        विशेष

            राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूरची अयोग्य आर्थिक व्यवहारामुळे दैन्यावस्था झाली असून सध्याच्या परिस्थितीत सदर पतसंस्था शेवटची घटका मोजत आहे.

            या पतसंस्था अंतर्गत ४ हजारांच्या जवळपास खातेदार व ठेवीदार असून त्यांना अयोग्य आर्थिक व्यवहाराचा फटका बसला आहे.पतसंस्था अंतर्गत झालेला आर्थिक गैरव्यवहार अनेक खातेदारांचे व ठेवीदारांचे आयुष्य बरबाद करणारा ठरला आहे.यामुळे आजच्या स्थितीत अनेक खातेदार व ठेवीदार दैन्यावस्थेत जिवन कंठीत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

         यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर र.न.८०३ च्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी गंभीरपणे व्हावी यासाठी खातेदार व ठेवीदार सुरुवातीला ३ दिवस लक्षणिक साखळी उपोषण करणार आहेत.

             लक्षणिक साखळी उपोषसाला चौकशी अधिकाऱ्यांनी महत्त्व दिले नाही तर साखळी उपोषसाच्या ३ दिवसांनंतर पतसंस्था अंतर्गत खातेदार व ठेवीदार आमरण उपोषण करणार आहेत.पतसंस्था मधील आर्थिक घोटाळा उजेडात आणणाऱ्या समितीचे संयोजक समाजसेवक किशोर अंबादे असणार आहेत.

         खातेदार व ठेवीदारांना संशय आहे की राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिमूर मध्ये आर्थिक घोटाळा करणाऱ्यांना काही लोकप्रतिनिधी राजकीय शक्तींचा पावर वापरून वाचवीत आहेत आणि चौकशीला जैसे थे ठेवीत आहेत.

             आर्थिक घोटाळा करणारे कोणीही असोत त्यांना शोधून काढणे हे तक्रार दाखल झालेल्या संबंधित यंत्रणेचे काम आहे,असेही खातेदारांचे व ठेवीदारांचे म्हणणे आहे.