तेलंगणात बसपाचा दबदबा,बसपा सुप्रिमो बहन मायावती यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष आर.एस.प्रवीण तेलंगणाचा गड जिंकणार? — निवडणूक रणसंग्राम..

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

           आयपीएस अधिकारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असताना सुद्धा त्यांनी जनतेच्या हितासाठी सेवानिवृत्ती घेतली आणि बसपा ज्वाईन केल्यानंतर त्यांनी तेलंगणा राज्यातील नागरिकांच्या हक्कांसाठी विविध विषयांवर दमदार आंदोलने केलीत.

           त्यांच्या लोकहितार्थ आंदोलनामुळे तेलंगणा राज्यातंर्गत नागरिकांच्या हृदयात त्यांनी मजबूत स्थान निर्माण केले आहे.त्यांच्या सभांना मतदारांची होणारी प्रचंड गर्दी बघता ते तेलंगणा राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचू शकतात असेच तेथील निवडणूक वातावरण आहे.

           बसपा सुप्रिमो बहन मायावती यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष आर.एस.प्रवीण यांनी सत्तापरिवर्तन व तेलंगणा राज्यातील जनतेचा सर्वांगिण विकास या अनुषंगाने वेळोवेळी लोकजागृती केली.

        नागरिकांच्या सर्वांगिण कल्याणासाठी झपाटलेला कर्तव्यदक्ष,इमानदार,सतर्क व अनुभवी बसपा प्रदेशाध्यक्ष असल्याचे तेलंगणा राज्यातील मतदारांचे म्हणणे आहे.

            आजच्या स्थितीत तेलंगणा राज्याच्या सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी तेथील प्रदेश प्रभारी,प्रदेशाध्यक्ष आर.एस.प्रविण,सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्तागण बसपा सुप्रिमो बहन मायावती यांच्या सुचनेनुसार जबाबदारीने कर्तव्य पार पाडीत आहेत.

        तेलंगणा राज्यात बसपा सुप्रिमो बहन मायावती यांच्या प्रचार सभा लागल्या आहेत.त्या तेथील मतदारांना सत्य तेच मार्गदर्शन करुन बसपाला सत्तेवर बसवा असे आवाहन करतील.

            मात्र,आर.एस.प्रवीण यांच्या स्पष्ट व सत्य कर्तव्यातून त्यांनी तेलंगणा मतदारांच्या मनात स्थान निर्माण केले असून मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारा योग्य योध्दा म्हणून त्यांच्याकडे तेथील मतदार बघत आहेत.

             विधानसभा निवडणूक अंतर्गत तेलंगणा राज्याचा प्रचार पारा खूप चढला असून,तेलंगणा राज्यात बसपाला सत्तेपर्यंत पोहचविण्यासाठी पुढे आलेली जनता ३ डिसेंबरला कळणार आहे.