छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सहात साजरी…

ऋषी सहारे

   संपादक

 कोरची मुखालया पासुन‌ 9 कि.मी अंतरावर धनंजय स्मृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेतकाठी येथे दिनांक – 19 फेब्रुवारी 2024 रोज सोमवार ला अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य पी.बी. नागपुरे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अमित दास गटशिक्षणाधिकारी कोरची, हिराजी रामटेके केंद्र प्रमुख बोटेकसा , वाडणकर सर कोरची, मांडवे जि. प. प्राथमिक शाळा पकनाभट्टी. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.