Home Maharashtra पत्रकाराला धमकी देणाऱ्या काँग्रेस नेत्यावर कारवाईची मागणी… — देसाईगंज प्रेस क्लबचे...

पत्रकाराला धमकी देणाऱ्या काँग्रेस नेत्यावर कारवाईची मागणी… — देसाईगंज प्रेस क्लबचे ठाणेदारांना निवेदन…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

  दखल न्यूज भारत

देसाईगंज :- पत्रकार घनश्याम कोकोडे यांना फोनवरून मारहाणीची धमकी देत, व्हॉट्सअॅपवरून अश्लील शिवीगाळ आणि अपमानास्पद संदेश पाठवल्याने या घटनेने स्थानिक पत्रकार संघटना आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून पत्रकाराला धमकी देणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी प्रेस क्लब देसाईगंजच्या देसाईगंज पोलिसांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

        याबाबत असे कि, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दैनिक महासागर या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राच्या गडचिरोली आवृत्तीत स्वयंघोषितांना सदस्य पदाचे लागले डाहोळे” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीत कोणत्याही व्यक्तीचे नाव उल्लेखले नव्हते. तरीही कुरूड येथील मनोज महादेव ढोरे याने ही बातमी स्वतःशी संबंधित असल्याचा गैरसमज करून घेत, पत्रकार घनश्याम कोकोडे यांना धमकीचा फोन केला आणि नंतर व्हॉट्सअॅपवर अयोग्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

अधिकृत तक्रार आणि कायदेशीर पाऊल या घटनेनंतर पत्रकार कोकोडे यांनी तत्काळ देसाईगंज पोलीस ठाण्यात दिली. देऊन पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.

         घटनेच्या निषेधार्थ देसाईगंज प्रेस क्लबतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, या निवेदनात पत्रकारावर अशाप्रकारे धमक्या, अपमान आणि दबाव आणणे ही लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी बाब आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, पत्रकार संरक्षण कायदा प्रभावीपणे अंमलात आणणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले. 

         निवेदन देतांना जेष्ठ पत्रकार शामराव बारई, प्रेस क्लब अध्यक्ष प्रकाश दुबे, उपाध्यक्ष विलास ढोरे, पुरुषोत्तम भागडकर, मो. अरिफ शेख, नासिर जुम्मन शेख, बाबू कुरेशी, किशोर मेश्राम, पंकज चहांदे, रवी कुथे, अरुण राजगिरे, हेमंत दुनेदार, नितेश पाटील आदी उपस्थित होते.