ग्रामसेवक मनोहर दलांजे निलंबित…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादिका

           चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामसेवक मनोहर दलांजे यांना महादवाडी ग्रामपंचायतीच्या गैरप्रकारातंर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सिईओ विवेक जान्सन यांनी निलंबित केले आहे.

          निलंबन पत्र पंचायत समिती चिमूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे थडकले असून आज ते पत्र ग्रामसेवक मनोहर दलांजे यांना देण्यात आले आहे.

          सदर पत्रामध्ये राजूरा पंचायत समिती मध्ये तात्काळ रुजू होण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

            ग्रामसेवक मनोहर दलांजे यांच्याकडे चिमूर पंचायत समिती अंतर्गत महादवाडी ग्रामपंचायतीचा मुख्य प्रभार होता.याचबरोबर डोमा व कोटगाव ग्रामपंचायतींचा अतिरिक्त प्रभार होता.

         ग्रामसेवक मनोहर दलांजे राजूरा पंचायत समितीमध्ये रुजू होत असले तरी कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत गैरव्यवहार प्रकरण सुध्दा त्यांच्यासह तेथील सरपंच सौ.मुक्ताताई कापसे यांच्या अंगलट येणार असल्याची चर्चा आहे.