शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथील ग्रामपंचायतीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात मुख्यमंत्री सम्रुद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामवासीयांची ग्रामसभा दि १७ सप्टेंबरला पार पडली.
यावेळी सरपंच्या रेखा पिसे,उपसरपंच चंद्रभान कामडी,भाजपा प्रतिनिधी राजु पाटील झाडे,मनिष तुम्पल्लीवार, संजयभाऊ डोंगरे,संवर्ग विकास अधिकारी नितीन फुलझेले,ग्राम अधिकारी राजेश कांबळे, विस्तार अधिकारी शामकुळे,ग्रामपंचायत सदस्य संदीप पिसे,नानाजी दडमल,संगीता कामडी,संगीता वैरागडे,पद्मश्री नागदेवते,सरिता जनबंधु,साधना दडमल,ललिता कडुकार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले…
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाने १०० दिवसाचा उपक्रम हाती घेतला आहे.स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक समस्यांच्या निपटाऱ्याची आणि जनतेच्या समाधानाची हमी असते.म्हणून सरकारने मुख्यमंत्री सम्रुद्ध पंचायतराज अभीयान सुरू केले आहे.डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या अभीयानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना रोख स्वरूपात पुरस्कार देण्यात येणार आहे.
तेव्हा ग्रामपंचायतींनी सर्व घटकांवर काम करावे,गावाचा विकास साधावा असे आवाहन करीत मुख्यमंत्री सम्रुद्ध पंचायतराज अभियानाचे उद्दिष्ट काय यावर अतिथींनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
ग्रामसभेला अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,गट प्रवर्तक,महीला बचत गट,आरोग्य कर्मचारी,पंचायत समिती स्तरावरील अधीकारी, शीक्षक,प्रतिष्ठित नागरिक,महीला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



