प्रा.महेश पानसे,डाॅ.विठ्ठल बोरकुटे,सुबोधदादा “सेवावर्ती” ने सन्मानित.

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका 

 

नागभिड: – नेवजाबाई हितकारिणी विदयालयातर्फे घोषीत सेवावर्ती पुरस्कार मन्यवरांचे हस्ते नुकताच राष्ट्रसंत विचारमंचावर प्रदान करण्यात आला. सदर सन्मान विवीध क्षेत्रात सेवाभावी,जनकल्याण व आदर्श कार्या करिता प्रदान करण्यात आला. असून सदर सन्मान राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे,श्री गुरूदेव वस्तीगृहाचे अध्यक्ष तथा नागभिड तालुक्यातील सेवाभावी वैद्द विठठलराव बोरकुटे,आत्मानुसंधान अडयाळ टेकडीचे संचालक सुबोधदादा यांना माजी मंत्री विजय वडेट्टीवार,माजी मंत्री शोभाताई फडणविस,शिक्षक आमदार सुधाकरराव अडवाले,ने.हि.शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. 

 

       पत्रकारितेतील चाणक्य म्हणून परिचीत प्रा.महेश पानसे हे गत २५ ,वर्षांपासुन अविरतपणे आपल्या लेखनीच्या माध्यमातून विवीध सामाजीक विषयांवर काम करीत असून विदर्भातील अनेक पत्रकारांचे मार्गदर्शक आहेत.

            तर विठठल बोरकुटे हे गत ५०,वर्षांपासून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यदुत म्हणून काम करीत आहेत. बोरकुटे राष्ट्रसंताचे विचारांनी प्रेरित होऊन वस्तीगृहाचे माध्यमातून शेकडो विदयार्थ्यांना सुविधा पुरवीत आहेत.

         सुबोधदादाचे कार्य राष्ट्रसंताची विचारधारा पुढे नेण्यात मोलाची भूमिका सांभाळत आहेत. ने.हि.विदयालयातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या भव्य मेळाव्यात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.