Home Maharashtra जांभुळघाट आरोग्य केंद्र बनले सापांचे आश्रय स्थान!… — रुग्णांची सुरक्षा ऐरणीवर,”जिल्हा...

जांभुळघाट आरोग्य केंद्र बनले सापांचे आश्रय स्थान!… — रुग्णांची सुरक्षा ऐरणीवर,”जिल्हा आरोग्याधिकारी लक्ष देणार काय?..

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

         गोरगरीब जनतेसाठी आरोग्य केंद्र हे उपाचारांचे प्राथमिक स्थळ असते.आरोग्य केंद्रात दररोज रुग्ण उपचारासाठी जातात.आवश्यकते नुसार भरती राहतात.मात्र जांभुळघाट आरोग्य केंद्रातच साप आश्रय घेऊ लागले असल्याने परिसरातील रुग्णांत व नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

            चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात जांभुळघाट आरोग्य केंद्र आहे.या आरोग्य केंद्रात नेहमी साप दिसत असल्याने रुग्णांसह,डॉक्टर,कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

           दोन दिवसांपूर्वी जांभुळघाट आरोग्य केंद्रात वेल्या सापासह नाग आढळून आल्याने रुग्णांची व कर्मचाऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली.

        मात्र,नाग साप इशारांने आरोग्य केंद्राच्या इमारती बाहेर गेला तर वेल्या साप इमारती मध्येच आश्रयास होता.यामुळे उपस्थितांमधील भितीदायक वातावरण बघता सर्प मित्रांना बोलावून वेल्या सापाला पकडन्यात आले व गावापासून काही अंतरावर मोकळ्या ठिकाणी सोडण्यात आले.

     जांभुळघाट आरोग्य केंद्रांत वारंवार निघणाऱ्या सापांमुळे रुग्ण व परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

    असे असले तरी जांभुळघाट आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये साप येणार नाही,आश्रय घेणार नाही,यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी लक्ष देणार काय?