Home Maharashtra ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्याचा संकल्प :- तहसिलदार श्रीधर...

‘शासन आपल्या दारी’ अभियानातून शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्याचा संकल्प :- तहसिलदार श्रीधर राजमाने..  — मासळ बु.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान माणिका देवी सभागृह मासळ बु.येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

       समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचावा,या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

       यावेळी तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शासन-प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

         कार्यक्रमात महसूल विभाग,कृषी विभाग,आरोग्य विभाग नोंदणी व मुद्रांक विभाग,वन विभाग,भूमी अभिलेख विभाग,महिला व बाल कल्याण विभाग,पंचायत विभाग,तसेच पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने विविध योजनांची माहिती देण्यात आली. 

        संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाधीक्षक तालुकातालुका भूमि अभिलेख चिमूर नीलकंठ कावळे,प्रमुख पाहुणे सरपंच विकास धरणे,नायब तहसीलदार सूर्यकांता पाटील,अन्नपुरवठा पुरवठा निरीक्षक प्रवीण वानखेडे,वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर,मंडळधिकारी दीपक मून,दुय्यम निबंधक निखिल कोतवडे,तलाठी उमेश पाटील,ग्रामसेवक केशव गजबे उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे संचालन प्रियंका वाघ तलाठी यांनी केले तर आभार प्रदर्शन तलाठी श्रद्धा भोईर यांनी केले.यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांविषयी माहिती जाणून घेतली.

       या अभियानामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध विभागांच्या योजनांची माहिती उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.