अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन संपन्न.

युवराज डोंगरे 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)

    अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा अमरावतीचे जिल्हा अधिवेशन नुकतेच संगीत सूर्य केशवराव भोसले हीरक महोत्सवी सभागृह, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (वि. म. वि.) अमरावती येथे संपन्न झाले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष आदरणीय देवीदासजी बस्वदे यांनी भूषविले तर उद्घाटक म्हणून मा.खासदार नवनीत रवी राणा उपस्थित ह्या होत्या. आणि प्रमुख अतिथी म्हणून माननीय आमदार सुलभाताई खोडके, दिगंबर जगताप राज्य उपाध्यक्ष, किरण पाटील राज्य उपाध्यक्ष, पंडितराव देशमुख, राजाभाऊ होले, नीलकंठ यावले, सुनिता पाटील, ज्योती उभाड, समता पॅनल चे सर्वश्री संचालक मनोज चौरपगार, संजय नागे, प्रभाकर झोड, मंगेश खेरडे, गौरव काळे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष पंकज गुल्हाने, उर्दू शिक्षक संघटना (मीर मेदी अली)चे राजिक हुसेन सर, मनपा शिक्षक संघाचे धोत्रे, अपंग कर्मचारी संघटनेचे राजेंद्र देशमुख, जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष बाबाराव गुंड व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शकील आणि ऋषाली देशमुख यांनी संयुक्तपणे केले. तर आभार प्रदर्शन सुभाष सहारे यांनी मानले.

    शिक्षकांचे पंचप्राण दादासाहेब दोंदे यांचे प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरावात झाली. किरण पाटील राज्य उपाध्यक्ष यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व संघटनेचा स्थापना, आंदोलन, यश, वर्तमानातील मागण्या व इतिहास आपल्या प्रास्ताविकात मांडला. 

या भरगच्च कार्यक्रमाचे उद्घाटन मा.खासदार नवनीत राणा यांचे हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगत मधे शिक्षकांचे समस्या सोडविण्याबद्दल कटबद्ध असल्याचे सांगितले. तसेच आदरणीय सुलभाताई खोडके यांनी जुनी पेन्शन करिता प्रयत्न करणार असल्याचे आपल्या मनोगतमधे उल्लेख केला. उद्घटनिय भाषणानंतर

मा.दादासाहेब दोंदे यांचे प्रथम अधिवेशन निमित्तचे १९५४ चे भाषण जिल्हा संघाचे वतीने पुनर्मुद्रित करून या अधिवेशनात प्रकाशित करण्यात आले. शिक्षक बँकेमध्ये अखिल संघाचे नेतृत्वातील समता पॅनल मधे निवडून आलेल्या सर्वश्री संचालक मनोज चौरपगार, संजय नागे, प्रभाकर झोड, मंगेश खेरडे, गौरव काळे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्हा परीषद तर्फे २०२१-२२ करिता आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सर्वश्री सूरज मंडे, सुनील बागडे, अशोक कणसे यांचा सन्मान करण्यात आला. अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत जुलै २२ ते मार्च २३ या कलावधी मधे सेवानिवृत्त झालेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार संघटनेच्या व्यासपीठावर मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची विचारधारा आवडल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे समूहाने संघटनेत नव्याने प्रवेश केला.त्यामधे प्रामुख्याने संजय वाटाणे, संदीप घाटे, उज्वल पंचवटे, प्रवीण सोनार, राजेश मुंधळा, गजानन ठाकरे, यांचेसह अनेक शिक्षक व त्यांचे शेकडो मित्रमंडळी यांनी आपला प्रवेश निश्चित केला. आदरणीय देविदास बस्वदे यांनी संघटनेचे ध्येय धोरणे याविषयी अधिवेशन मधे मार्गदर्शन केले.

त्यांनतर अखिल जिल्हा जिल्हा संघाची नवनियुक्त कार्यकारणी आदरणीय किरण पाटील यांनी घोषित केली.

नवीन जिल्हा कार्यकारणी मधे गजानन चाधरी अध्यक्ष, सुभाष सहारे सरचिटणीस, संजय साखरे कोषाध्यक्ष, अशोक चव्हाण कोषाध्यक्ष , तर ज्योती उभाड, प्रमोद घाटोळ आणि संजय वाटाणे यांची ज्येष्ठ उपाध्यक्षपद निवडीची घोषणेनंतर संघाचे राज्य अध्यक्षांचे हस्ते सर्व पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. संघटनेचे शिलेदार कमलाकर कदम आणि प्रशांत ठाकरे यांचा वाढदिवस निमित्त व्यासपीठावरून शुभेछ्या देण्यात आल्या. 

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केल्याबद्दल मान्यवरांचे हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देवून शेख शकील व वृषाली देशमुख यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

मागील अनेक वर्षापासून घरावर तुळशीपत्र ठेवून संघटनेसाठी अहोरात्र काम करणारे श्री किरण पाटील यांचा देविदास बस्वदे यांनी स्वागत केलं

 त्याचप्रमाणे पंडितराव देशमुख, नीलकंठ यावले,आणि राजेंद्र होले यांचाही संघटना कामकाज बाबत सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमातील जिल्ह्यातील शिक्षक संघावर प्रेम करणार शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे प्रसिध्दी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.