..अनं २६ वर्षांनी मिळाले बालपण… — साकोली से.ए.सो. शाळेचे बालमित्र आले एकत्र…

      शेखर इसापूरे

  विभागीय प्रतिनिधी,नागपूर

         दखल न्यूज भारत

 

 साकोली : जेव्हा २६ वर्षांनंतर बालमित्र एकत्र आल्याचा अनुभव व जून्या आठवणींना उजाळा देत मित्रांचे मन मंगळवार १६ जानेवारीला श्री दूर्गाबाई डोह कुंभली भव्य जत्रेला भेट झाली. कारण हा अविस्मरणीय क्षणाला सर्व मित्र जणू भावूक झाले होते. 

           मंगळवार १६ जाने.ला जो सर्वांना असा आनंदमयी प्रसंगी यात्रेवर अविस्मरणीय अनुभव होता की, जणू सर्व आपल्या पदांची गरीमा विसरले होते. सर्वांचा हा तब्बल २६ वर्षानंतरचा होता. साकोलीतील सेकंडरी एज्युकेशन सोसायटी शाळेत वर्ग १० वी सन १९९६ पर्यंत शिक्षण घेऊन दूरावलेले आज येथे मात्र एकत्र आले.

         या बालमित्रांमध्ये से.नी. आर्मी हरजीत बांते, चंदू कुथे, चेतन चौहान, दूर्गेश चौहान, उमेश बन्सोड, सुशांत गुप्ता, भंडारा पोलीस हरीश बुंदेले, आशिष चेडगे, अनिल चुघ, प्रवीण भांडारकर, दिपक जांभूळकर, मनिष शहारे, अविनाश रंगारी, रविंद्र लांजेवार, आनंद गायकवाड, डॉ. अमित शहारे, सतिश धुर्वे, मनोज डोये, अमोल हाडगे, मनिष कापगते, धर्मेंद्र वाडीभस्मे, प्रितम सुर्यवंशी, उमेश बन्सोड व इतरांचा समावेश होता.

          विशेष म्हणजे यांची भेट अतिशय दुर्मिळ असून लांब पल्ल्याच्या गावी असतात. सर्व आलेल्या बालमित्रांचे सेकंडरी एज्युकेशन सोसायटी समुहाने स्वागत करून येथे श्री दूर्गाबाई डोह जत्रेचा मनसोक्त आनंद लुटला हे २६ वर्षांनंतरचा अविस्मरणीय अनुभव होता हे उल्लेखनीय.