भन्ते भगीरथच्या घरा शेजारारुन लाखोची अवैध रेती व सागवान पाट्या जप्त… — घोट वनविभागाची कारवाई…

ऋषी सहारे

संपादक

      गडचिरोली _ चामोर्शी तालुक्यातील कोठरी जंगलात अवैध घर बांधून राहणारे भन्ते भगीरथ यांच्या घरा शेजारी लाखो रुपयांची शंभर ब्रास रेती, सागवणी पाट्या व सेंट्रीगचे फाटे सापडले असून सदर सर्व साहित्य पंचनामा करून जप्त केले. 

          सदर कारवाई गुप्त माहीतीच्या आधारे वनविभाग घोटचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी आपल्या चमूसह केली.

          गुप्त माहीतीच्या आधारे वनविभाग घोटचे वनपरिक्षेत्र आधिकारी वाडीघरे हे आपल्या फौजफाट्या सहीत,(जवळपास १५ कर्मचारी) कोठरीचा जंगलात पोहचले.जिथे घोट वनविभागाचे गार्डन आहे.गार्डनच्या समोर भन्ते भगीरथ यांनी अवैध घर बांधले आहे.त्यांच्या घराजवळ भन्ते भगीरथ यांनी अंदर १० फुट खोल अंडर ग्राउंड रुम तयार केली आहे.

          अंडर ग्राऊंड रुमची तपासणी केली असता सात सागवणी पाट्या सापडल्या आहेत.राहात असलेल्या जंगलातील सागवान झाडे कापून त्यांचा पाट्या तयार करून अंडर ग्राऊंड रुममध्ये ठेवल्या असल्याचा सुगावा लागला होता,असे आमच्या संपादक सोबत बोलतांना वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगीतले. 

         घोट वनविभागाचे कर्मचारी यांनी सदर जागेची सिताफीने झडती घेतली.परंतू फक्त पाच सहा सागवणी पाट्या सापडल्या.तर जवळच लागुन असलेली जवळपास शंभर ब्रास रेती सुध्दा जप्त केली.

         सदर रेती गावातील बंगालीच्या ट्रॉक्टरने टाकण्यात आली होती असे बोलल्या जात आहे.त्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे.रेती सुध्दा लाखो रुपये किंमतीची असल्याचे तपासातून पुढे आले आहे. 

        भन्ते भगीरथ व दोन साथीदार असे तिघेही वनविभागाची गाडी दिसताच दुम दबाके जंगलात पळाले असल्याचे Rfo ने सांगीतले. 

             सदर मालाचा पंचनामा करून भन्ते भगीरथच्या नावाने पकड वॉरान्ट सोडणार असल्याचे RFO वाडीघरे यांनी सांगीतले.घोट वन क्षेत्रातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.त्यामुळे रेती तस्करांचे व झाडे तोडणाऱऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.